अलिगड: जीनांनंतर आता सर सैय्यद अहमद खान यांच्या चित्रावरूनही वाद

जीनांच्या चित्रावरून सुरू झालेला वाद अद्यापही कायम आहे. या वादावरून अद्यापही विद्यार्थी आंदोलन करत आहेत.

Updated: May 5, 2018, 03:26 PM IST
अलिगड: जीनांनंतर आता सर सैय्यद अहमद खान यांच्या चित्रावरूनही वाद title=

नवी दिल्ली: अलिगड मुस्लिम युनिवर्सिटी (एएमयू) मधील मोहम्मद अली जीना यांच्या चित्रावरून वाद निर्माण झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता एएमयूचे संस्थापक सर सैय्यद अहमद खान यांच्या चित्रावरूनही वाद निर्माण झाला आहे. प्रसारमाध्यमांतून आलेल्या वृत्तानुसार, येथील खेर परिसरातील पीडब्ल्यूडीच्या विश्रामगृहातून सर सैय्यद अहमद खान यांचे चित्र हटविण्यात आले आहे. हे चित्र हटवल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. 

दरम्यान, हे चित्र हटवण्यामागचे नेमके कारण काय हे मात्र समजू शकले नाही. तर, दुसऱ्या बाजूला अलिगडमध्ये जिनांच्या चित्रावरून निर्माण झालेल्या वादानांतर पत्रकारांशीही गैरवर्तन करण्यात गेल्याचे वृत्त आहे.  

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकार आणि छायाचित्रकारांना लक्ष्य करण्यात आले. या वेळी झालेल्या संघर्षात काही पत्रकारांना मारहाणही करण्यात आली. दरम्यान, जीनांच्या चित्रावरून सुरू झालेला वाद अद्यापही कायम आहे. या वादावरून अद्यापही विद्यार्थी आंदोलन करत आहेत.