AI Powered Cameras Save Elephants: सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये हत्तींचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. यामध्ये हत्तीच्या अपघातांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात असते. हत्ती जंगलातून जात असताना अनेकदा रेल्वे लाईन क्रॉस करतात. अशावेळी जीवघेणा अपघात होऊ शकतो. अशा अपघातापासून वाचण्यासाठी AI टेक्नॉलॉजीचा कॅमेऱ्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
ओडिशातील सुंदरगड जिल्ह्यातील राउरकेलाच्या जंगलात हत्तींच्या प्रजाती वाचवण्यासाठी मोठं पाऊल उचलण्यात आले आहे. येथे AI कॅमेऱ्यांच्या मदतीने हत्तींचे संरक्षण केले जात आहे. अलीकडे हत्तीचं कुटुंब ज्यामध्ये दोन मोठे हत्ती आणि एका पिल्लाचा समावेश आहे. तेरेल्वे रुळांच्या दिशेने जात होते, जिथे त्यांची समोरून येणाऱ्या ट्रेनशी टक्कर होऊ शकते, परंतु AI तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या कॅमेऱ्यांमुळे आणि रेल्वेच्या शहाणपणामुळे आणि वनविभागाने हा अपघात टळला.
AI camera captures & zooms into the elephants approaching the railway line, sending alerts to the control room for stopping the train.
We had solutions. Happy to see that the ones implemented are now giving results.These 4 cameras along the track was part of mitigation measures. pic.twitter.com/RBNe0hPOnl— Susanta Nanda (@susantananda3) December 8, 2024
भारतीय वन सेवेचे निवृत्त अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या एक्स हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये हत्ती रेल्वे मार्गाकडे जाताना दिसत आहेत. त्याचवेळी एआय तंत्रज्ञानाने सज्ज कॅमेरा झूम करून या हत्तींना पाहिल्यानंतर लगेचच ट्रेनवर नियंत्रण ठेवण्याचा संदेश दिला. तर लोको पायलटने अत्यंत हुशारीने ट्रेन थांबवून हत्तींचा अपघातापासून वाचवले. भारतीय वन सेवेचे निवृत्त अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'एआय कॅमेऱ्याने ही संपूर्ण घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. कॅमेऱ्याने हत्तींना पाहताच ताबडतोब नियंत्रण कक्षाला ट्रेन थांबवण्याचा संदेश दिला. मला हे पाहून खूप आनंद झाला की, आता आमच्याकडे यावर उपाय आहे. ट्रॅकजवळ AI तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या चार कॅमेऱ्यांमुळे मोठी दुर्घटना टळली.
त्यांनी पुढे माहिती दिली की, या प्रकल्पाला 'आरएसपी' ने त्यांच्या साइट स्पेसिफिक वन्यजीव संरक्षण योजनेतून निधी दिला आहे. जी राउरकेला वन विभागात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आली. आता कोइंझार आणि विवणा वनविभागही हे तंत्रज्ञान वापरणार आहेत.
त्याचबरोबर जंगलातून आलेल्या या व्हिडिओवर लोकांनी खूप टाळ्या वाजवल्या आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत 3 लाख 20 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि 7 हजारांहून अधिक कमेंट्स आल्या आहेत. या तंत्रज्ञानामुळे लोकांनी वन आणि रेल्वे विभागाचे भरभरून कौतुक केले आहे. एका यूजरने लिहिले आहे की, 'हे पाहून खूप आनंद झाला, तंत्रज्ञानाचा योग्य वापर, कदाचित भविष्यात या तंत्रज्ञानाचा वापर शिकारी शोधण्यासाठीही होऊ शकेल'. सुशांत नंदा यांनी उत्तर दिले, 'सिम्लीपाल व्याघ्र प्रकल्पातील शिकारीवर लक्ष ठेवण्यासाठी हे तंत्रज्ञान आधीपासूनच वापरले जात आहे'.