मुंबई : Aadhaar PVC Card: आधार कार्ड (Aadhar Card) हे एक अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे, ज्याशिवाय आता देशात कोणतेही काम होत नाही. भारतातील प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. हा पत्ता पुरावा जन्माचा पुरावा म्हणून देखील वैध आहे. बँकेच्या कामापासून पोस्ट ऑफिस आणि पासपोर्टपर्यंत आधार कार्ड असणे आवश्यक आहे. आधार जारी करणारी संस्था UIDAI वेळोवेळी आधार कार्डशी संबंधित माहिती शेअर करत असते. आता UIDAIने एक नवीन सुविधा सुरु केली आहे.
UIDAI ने अलीकडे PVC कार्डवर आधार तपशील प्रिंट करण्यासाठी 'आधार पीव्हीसी कार्ड' लाँच केले आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे खास सुरु करण्यात आले आहे.
UIDAI ने माहिती देताना सांगितले की, 'आधार PVC कार्ड ऑर्डर करा' ही UIDAI ने सुरू केलेली एक नवीन सेवा आहे, जी आधार धारकाला नाममात्र शुल्क भरुन PVC कार्डवर त्याचा/तिचा आधार तपशील छापण्याची सुविधा प्रदान करते. ज्या रहिवाशांकडे नोंदणीकृत मोबाइल क्रमांक नाही ते नोंदणीकृत, पर्यायी मोबाइल क्रमांक वापरुन ऑर्डर देऊ शकतात.
आधार कार्ड धारकाच्या सोयीसाठी आधार पीव्हीसी कार्डमधील सुरक्षित क्यूआर कोड, होलोग्राम, मायक्रो टेक्स्ट, घोस्ट इमेज, जारी करण्याची तारीख आणि प्रिंट, गिलोचे पॅटर्न आणि 'आधार लोगो' देण्यात आला आहे. तुम्हालाही ऑर्डर करायची असेल तर तुम्ही कोणताही मोबाईल नंबर वापरुन ऑर्डर करु शकता. तुम्ही फक्त एक मोबाईल नंबर वापरुन तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी ऑर्डर करु शकता. UIDAI आधार PVC कार्डसाठी, तुम्हाला 50 रुपये शुल्क भरावे लागेल.
यासाठी प्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in किंवा https://myaadhaar.uidai.gov.in वर जा.
- आता, 'ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड' सेवेवर क्लिक करा आणि तुमचा 12 अंकी आधार क्रमांक 28 अंकी नावनोंदणी आयडी प्रविष्ट करा.
आता इथे तुम्ही तुमचा सिक्युरिटी कोड एंटर करा आणि मग नोंदणीकृत मोबाईल नंबरवर मिळालेला OTP टाका.
आता 'नियम आणि अटी' च्या पुढील चेक बॉक्सवर क्लिक करा.
त्यानंतर OTP पडताळणी पूर्ण करण्यासाठी 'सबमिट' बटणावर क्लिक करा.
आता आधार तपशीलांच्या पूर्वावलोकनासाठी एक स्क्रीन पॉप अप होईल, त्यावर जा.
आता त्याची पडताळणी केल्यानंतर, 'पेमेंट करा' हे निवडा.
यानंतर, पुढील चरणात, तुम्हाला क्रेडिट/डेबिट कार्ड, नेट बँकिंग आणि UPI सारख्या पेमेंट पर्यायांसाठी फीचे पर्याय दिसतील.
यानंतर, यशस्वी पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला डिजिटल स्वाक्षरीसह एक पावती मिळेल जी तुम्ही डाऊनलोड देखील करु शकता.
तुम्हाला एसएमएसद्वारे सेवा विनंती क्रमांक देखील मिळेल.