स्टेजवर डान्स करताना हार्ट अटॅकमुळे कोसळलेल्या तरुणीबद्दल धक्कादायक माहिती उघड, 12 वर्षाच्या भावाचा...

सोशल मीडियावर एका 23 वर्षीय तरुणीचा डान्स करताना ह्रदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दरम्यान या 23 वर्षीय तरुणीबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 10, 2025, 04:48 PM IST
स्टेजवर डान्स करताना हार्ट अटॅकमुळे कोसळलेल्या तरुणीबद्दल धक्कादायक माहिती उघड, 12 वर्षाच्या भावाचा... title=

ह्रदयविकाराचा झटका आल्याने एका 23 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तरुणी लग्नात डान्स करत असताना स्टेजवरच तिला ह्रदयविकाराचा झटका आला आणि तिने जीव गमावला. परिणीता जैन असं या तरुणीचं नाव असून ती आपल्या चुलत भावाच्या लग्नासाठी मध्य प्रदेशातील इंदोर येथून विदिशाला आली होती. शनिवारी संगीत कार्यक्रमादरम्यान 200 पाहुण्यांनी उपस्थित लावली होती. यावेळी तरुणी 'शरारा शरारा' हिंदी गाण्यावर डान्स करत होती. परफॉर्मन्स सुरु केल्यानंतर फक्त 30 सेकंदात परिणीता खाली कोसळली. कुटुंबातील काही डॉक्टरांनी तिला सीपीआर देत वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काहीच फायदा होत नसल्याचं लक्षात आल्यानंतर जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तिला ह्रदयविकाराचा झटका आला असून, मृत्यू झाल्याचं जाहीर केलं. 

Video: बहिणीच्या लग्नात नाचताना 23 वर्षीय तरुणी स्टेजवर कोसळली; थेट तोंडावर आपटल्यानंतर सोडला प्राण

 

परिणीताने आपलं एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं होतं आणि आपल्या आई-वडिलांसह इंदोर येथे राहत होती. धक्कादायक बाब म्हणजे तिने ह्रदयविकाराच्या झटक्यामुळेच आपल्या 12 वर्षांच्या भावाला गमावलं होतं. 

२३ वर्षीय तरुणीचा हृदयविकाराने अचानक मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा आरोग्यासंबंधी चर्चासत्र सुरु झालं आहे. मागील काळात अनेकदा तुलनेने तरुण आणि दिसायला तंदुरुस्त लोक नाचताना किंवा खेळताना खाली कोसळून मृत्यूमुखी पडत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

डान्स करताना किंवा खेळताना अशाप्रकारे मृत्यू झाल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असताना मीडियावर अनेकांनी कोविड साथीच्या आजारानंतर अशा घटनांमध्ये वाढ झाली असून, त्यांचा लसींशी संबंध आहे का? असा प्रश्न विचारला आहे. तथापि, डॉक्टरांनी असे दावे फेटाळून लावले आहेत आणि म्हटलं आहे की हृदयरोगामागे कौटुंबिक इतिहास आणि जीवनशैली घटक महत्त्वाची भूमिका बजावतात.

गेल्या वर्षी, तत्कालीन आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले होते की भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एका अभ्यासात असे आढळून आले की कोविड लसी हृदयविकारासाठी जबाबदार नाहीत. "जर आज एखाद्याला स्ट्रोक आला असेल तर काही लोकांना वाटते की ते कोविड लसीमुळे झाले आहे. आयसीएमआरने यावर सविस्तर अभ्यास केला आहे. (कोविड) लस हृदयविकारासाठी जबाबदार नाही. हृदयविकाराची अनेक कारणे आहेत, जसे की आपली जीवनशैली, तंबाखू आणि जास्त मद्यपान... कधीकधी, लोकांमध्ये चुकीची माहिती पसरते आणि काही काळासाठी एक धारणा तयार होते. परंतु आपण कोणताही निर्णय घेतला तरी तो डेटा-आधारित आणि वैज्ञानिक संशोधन-आधारित असावा," असं त्यांनी अधोरेखित केलं होतं.