23 कोटींचा रेडा पाहिलात का? फक्त विर्यातून कमावते 4 ते 5 लाख रुपये; दिवसाला खातो 20 अंडी

अनमोलच्या आलिशान आयुष्यासाठी फार किंमत मोजावी लागतो. मालक गिल रेड्याच्या डाएटवर दिवसाला 1500 रुपये खर्च करतो. यामध्ये ड्राय फ्रट, हाय कॅलरीजचा समावेश आहे.  

शिवराज यादव | Updated: Nov 15, 2024, 03:14 PM IST
23 कोटींचा रेडा पाहिलात का? फक्त विर्यातून कमावते 4 ते 5 लाख रुपये; दिवसाला खातो 20 अंडी title=

हरियाणामधील एक रेडा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या रेड्याची किंमत तब्बल 23 कोटी आहे. कृषी मेळाव्याच्या निमित्ताने या रेड्याची चर्चा रंगली आहे. या रेड्याचं नाव अनमोल असून त्याचं वजन 1500 किलो आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, पुष्कर मेळावा आणि अखिल भारतीय शेतकरी मेळाव्यात हा रेडा आकर्षणाचं केंद्र ठरत आहे. आपला आकार, वजन आणि प्रजनन क्षमता यामुळे अनमोल सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल झाला आहे. .

अनमोलच्या आलिशान आयुष्यासाठी पाण्याप्रमाणे पैसा खर्च करावा लागतो. मालक गिल रेड्याच्या डाएटवर दिवसाला 1500 रुपये खर्च करतो. अनमोलच्या निरोगी आयुष्य आणि ताकदीसाठी डाएटमध्ये ड्राय फ्रट, हाय कॅलरीजचा समावेश करण्यात येतो. यामध्ये 250 ग्रॅम बदाम, 30 केळी, 4 किलो डाळिंब, 5 किलो दूध आणि 20 अंडी आहेत. याशिवाय तेलाचा केक, हिरवा चारा, तूप, सोयाबीन आणि मकाही भरवला जातो. हा विशेष आहार हे सुनिश्चित करतो की अनमोल नेहमी मेळाव्यांसाठी आणि प्रजननासाठी तयार असेल.

अनमोलची तब्येतीसाठी इतरही विशेष काळजी घेतली जाते. म्हशीला दिवसातून दोनदा आंघोळ घालतात. बदाम आणि मोहरीच्या तेलाचे विशेष मिश्रण त्याची त्वचा चमकदार आणि निरोगी ठेवते. अनमोलवर इतका खर्च करावा लागत असतानाही गिल मात्र अजिबात हात आखडता घेत नाहीत. भुतकळात त्यांनी अनमोलचा खर्च भागवण्यासाठी त्याची आई आणि बहीण यांना विकलं आहे. अनमोलची आई दररोज 25 लिटर दूध उत्पादनासाठी ओळखली जात होती.

अनमोलचा प्रभावशाली आकार आणि आहार त्याच्या मूल्यामध्ये मोठा वाटा उचलत असताना प्रजननाची क्षमता त्याचं मलूल्य वाढवते. आठवड्यातून दोनदा जमा केल्या जाणाऱ्या अनमोलच्या वीर्याला प्रजननकर्त्यांमध्ये जास्त मागणी आहे. एकाची किंमत 250 रुपये असून शेकडो गुरांच्या प्रजननासाठी वापरला जाऊ शकतो. विर्याच्या विक्रीतून गिल महिन्याला 4 ते 5 लाखांची कमाई करत आहे. ज्यामुळे गिल यांना म्हशीच्या देखभालीचा खर्च करम्यात मदत मिळते. 

अनमोलला 23 कोटीत विकत घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतानाही गिल मात्र नकार देतात. याचं कारण ते अनमोलकडे कुटुंबातील सदस्य म्हणून पाहतात आणि त्याच्यापासून विभक्त होण्याचा विचार नाही.