Why people pee after drinking alcohole: आज या बातमीत आम्ही तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहोत, ज्याबाबत कदाचित तुम्ही अनेकवेळा एकांतात विचार केला असेल. याबाबत कदाचित तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना विचारलं देखील असेल. याच प्रश्नाचं आज या बातमीतून तुम्हाला उत्तर मिळणार आहे. हा प्रश्न आहे दारूचं सेवन केल्यानंतर तुम्हाला वॉशरूमला का जावं लागतं? दारू प्यायल्यानंतर अनेकजण जास्त प्रमाणात युरीन पास करतात. नक्की असं का होतं, याचबाबत आता आपण जाणून घेणार आहोत.
मद्यामध्ये ड्युरेटीक नावाचं तत्व असतं, ज्यामुळे तुमच्या शरीरात जास्त प्रमाणात युरीन तयार होते. याशिवाय अशी अनेक कारणं आहेत, ज्यामुळे तुम्ही मद्यसेवन केल्यानंतर तुम्हाला जास्तवेळ वॉशरूमला जावं लागू शकतं. मद्याने शरीरातील युरीन फ्लो वाढण्यास मदत होते. म्हणूनच मद्यसेवन केल्यावर तुम्हाला वारंवार वॉशरूमला पळावं लागतं.
यातील पाहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे किडनी आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण नियंत्रित करते. शरीरातील हे महत्त्वाचं कार्य रक्तातील उपलब्ध ऑस्मोलालिटीवर लक्ष ठेवून केलं जातं. ऑस्मोलॅलिटी म्हणजे रक्तातील इतर कण आणि द्रव्य यांचे गुणोत्तर. जर तुमच्या रक्तात कणांपेक्षा जास्त द्रव असतील तर तर तुमचं मूत्रपिंड शरीराला जास्त युरीन पास करण्याचे संकेत देतात.
अल्कोहोलचं प्रमाण: अल्कोहोलिक ड्रिंक्स आणि अल्कोहोल फ्री ड्रिंक यांची तुलना केल्यास अल्कोहोलयुक्त पेय पिण्याने शरीरात युरिनचं प्रमाण 2 ते 4 टक्के वाढतं. मद्यासंबंधित एका प्रसिद्ध इंग्रजी मासिकात याबाबत माहिती देण्यात आलेली आहे.
मद्यसेवनाचे प्रमाण: मद्यप्राशनानंतर वॉशरूमला पळावं लागण्याचं प्रमाण तुम्ही किती मद्यप्राशन प्रश्न करत आहात यावरही अवलंबून आहे.
शरीरातील हायड्रेशन लेव्हल - तुमच्या शरीरातील तरलपणा कमी असल्यास मद्यप्राशनानंतर तुम्हाला कमी वेळेस वॉशरूमला जावं लागू शकतं. मात्र तुमचं शरीर हायड्रेटेड असल्यास तुम्हाला जास्तवेळेस युरीन पास करावी लागू शकते. अनेक रिपोर्ट्समध्ये अल्कोहोल प्रत्येकाच्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकाराने काम करतं असल्याचं म्हंटलं आहे.