Sports Injuries: एखाद्या खेळाडूला दुखापत झाली नसेल असं होणं अशक्य आहे. दररोज खेळणाऱ्या खेळाडूंना दुखापत ही होतच असते. कारण खेळ म्हणजे दुखापत आलीच. खेळाडू कितीही चांगला असला तरी दुखापत होतेच. कॉन्टॅक स्पोर्ट्स जसे बॉक्सिंग, कबड्डी, रग्बी, रनिंग या दुखापत होण्याचा धोका जास्त असतो. तर बास्केटबॉल, व्हॉलीबॉल अशा लिमिटेड क़ॉन्टॅक्ट स्पोर्ट्समध्येही दुखापत होते. तर नॉन कॉन्टॅक्ट स्पोर्ट जसे गोल्फ, क्रिकेट, स्विमिंग यात दुखापत कमी होतात.
खेळात सर्वात जास्त होणाऱ्या दुखापती म्हणजे खांदा आणि गुडघ्याच्या दुखापती. कारण खांदा हा सांधा असला तरी तो अस्थिर असतो आणि कुठलेही खेळ खेळताना गुडघ्यावर जास्त दाब येतो.
पुण्यातील सिनियर ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. पराग संचेती यांनी दिलेल्या माहितीनुसार, मैदानी खेळ खेळताना दुखापत होते. त्यावेळी तात्काळ काय प्रथमोपचा द्यायला हवेत, असा प्रश्न अनेकदा येतो. त्यासाठी लक्षात ठेवा राईस (RICE).
प्रथमोपचार हे तात्पुरते असतात. गुडघ्याची नेमकी दुखापत समजण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी त्यानंतर रुग्णाला रुग्णालयात न्यावे.
गुडघ्याला होणारी दुखापत आणि त्यावर कोणते उपचार करावेत याबाबत डॉ. संचेती यांनी माहिती दिलीये.