Vitamin D deficiency 5 Symptoms: व्हिटॅमिन D एक आवश्यक पोषक तत्व आहे. जे आपल्या हाडांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फोरस खेचून घेण्यास मदत करते. त्यामुळं हाडं मजबूत होतात. किडनी किंवा यकृत रोग, क्रोहन रोग, सिस्टिक फायब्रोसिस आणि सेलिआक रोग असलेल्यांसह मुले, वृद्ध आणि गडद त्वचा असलेल्या लोकांना थंड हवामानात आजाराचे धोका अधिक असतो.
व्हिटॅमिन Dचा मुख्य स्त्रोत सूर्याची किरणे आहेत. मात्र, काही खाद्य पदार्थांमध्येदेखील व्हिटॅमिन डी आढळतो. हे व्हिटॅमिन डेअरी उत्पादन, मासे यात असते. जर तुम्ही शाकाहरी आहात तर हे पदार्थ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. तसंच, व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास शरीरात कोणती लक्षणे जाणवतात, हे जाणून घ्या.
मांसपेशियांमध्ये वेदना होणे, हाडांत वेदना, थकवा जाणवतो, उदास राहणे, पायऱ्या चढताना किंवा खाली बसल्यावर पुन्हा उठताना त्रास होणे, चालताना अडखळणे, हाडांमध्ये हेअरलाइन फ्रॅक्चर
मशरुममध्ये व्हिटॅमिन Dचा चांगला स्त्रोत असतो. खासकरुन जेव्हा मशरुम सूर्यप्रकाशात सुकवले जातात तेव्हा. यात डी2 एर्गोकॅल्सिफेरॉलची भरपुर मात्रा असते जी हाडांसाठी फायदेशीर असतात. तुम्हा हे सलाड, सूप किंवा भाजीत सामील करु शकता.
पालक ही खूप पौष्टिक भाजी आहे. यात व्हिटॅमिन Dची मात्रा असते. तसंच, आयर्न आणि कॅल्शियमसारखे पोषक तत्वेदेखील असतात. पालकाचे सेवन तुम्ही कच्च किंवा भाजीकरुनही खाऊ शकता.
केल हे एक सुपरफुड आहे जे व्हिटॅमिन Dसोबतच अन्य व्हिटॅमिन आणि खनिजांनी युक्त असते तसंच, हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असते. केल स्टीमकरुन किंवा सलाडमध्ये टाकून कच्चं खावू शकता.
ब्रोकोली एक क्रुसिफेरस भाजी आहे यात व्हिटॅमिन Dची मात्रा अधिक असते. यात फायबर आणि अन्य अँटी ऑक्सिडेंट्स असतात. ब्रोकोली तुम्ही सलाडमध्ये टाकून किंवा वाफवूनदेखील खावू शकता.
अंड्यातदेखील व्हिटॅमिन डीचा उच्च स्त्रोत असतो. दोन अंड्यांमध्ये 8.2 mcg व्हिटॅमिन डी असते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)