प्रथिन्यांची कमी ही सर्वात जास्त शाकाहारी लोकांमध्ये आढळून येते. प्रथिन्यांनसोबत अन्य पोषक तत्वाची देखील गरज असते कारण शाकाहारी पदार्थांमध्ये कमी प्रमाणत प्रथिने असतात. तर नॉनव्हेजमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात . त्यामुळे शरीराला निरोगी आणि सक्रिय ठेवण्यास मदत होते प्रथिनं शरिरात कमी असतील तर थकवा , केस गळती, जास्त भूक लागणे, कोरडी त्वचा यांसारखा लक्षणे दिसून येते. म्हणून शाकाहारी लोकांची त्यांचा आहारात टोफू किंवा पनीरचा समावेश करावा.
टोफू हे सोयाबिनच्या दूधापासून बनवले जाते. टोफूचे सेवन करणे हे आरोग्यास खूप लाभदायक असते. बऱ्याचं लोकांना टोफू काय असते हे माहितचं नसते. टोफूचे दुसरे नाव 'सोया पनीर' आहे, जे सोया दुधाच्या दह्यापासून बनवले जाते.
टोफूमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात. 100 ग्राम टोफूमध्ये 8 ग्राम प्रथिने , 65 कॅलरीज , 7 मिलिग्रॅम सोडियम , 121 मिलिग्रॅम पोटॅशियम आणि 0.3 ग्राम फायबर्स असतात. या शिवाय 30 टक्के कॅल्शियम आणि 7 टक्के मॅग्नेशियम असते .
टोफू खाल्ल्यानं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. हृदयास खूप फायदेमंद असते. धमन्यांना निरोगी ठेवते .
टोफू खाल्ल्यानं कर्करोग सारख्या आजारावर मात करतं. अँटिऑक्सिडेंट्स भरपूर असल्याने कर्करोग शरीरात पसरण्यास थांबते.
टोफूमुळे वजन देखील नियंत्रणात राहते. कॅलरीज कमी आणि उच्च प्रथिने असल्यानं वजन नियंत्रणात राहते. टोफूचे सेवन केल्यास लवकर वजन वाढत नाही.
हाडांना मजबूत ठेवण्यास मदत होते. ऑस्टिओपोरोसिस सारख्या समस्या कमी उद्भवू लागतात.
तोफूमुळे पांचनसंस्था मजबूत होते , टोफू मध्ये असलेले फायबर्स मुळे मेंदूचे स्वास्थ्य सुधारण्यात मदत होते .
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. )