मुंबई : आजकाल कामासाठी अनेक महिला घराबाहेर पडतात. त्यामुळे प्रदूषण, घाण, घाम याचा रोज सामना करावा लागतो. त्याचबरोबर उन्हाच्या झळाही जाणवू लागल्या आहेत. परिणामी चेहऱ्यावरील तेज कमी होऊ लागते. परंतु, शेहनाज हुसेन यांच्या या टीप्सने चेहऱ्यावरील तजेला परत मिळवण्यास मदत होईल.
चेहरा धुतल्यानंतर त्यावर थंड गुलाबपाणी लावा. त्यामुळे चेहऱ्याला होणारा रक्तपुरवठा सुधारतो. चेहऱ्यावर चमक येते.
उन्हाळ्यात आठवड्यातून किंवा दोन आठवड्यातून एकदा फेस मास्कचा वापर करा. ओठ आणि डोळ्यांखालची त्वचा सोडून चेहऱ्याच्या इतर भागात फेस मास्क लावा व सुकल्यानंतर पाण्याने धुवा.
उन्हाळ्यात आठवड्यातून २-३ वेळा चेहऱ्याला स्क्रब करा. त्यामुळे चेहऱ्यावरील मृत पेशी निघून जातील व चेहरा उजळ दिसेल.
उन्हाळ्यात पिम्पल्सची समस्या वाढते. यासाठी चेहरा स्वच्छ करण्याची गरज असते. म्हणून उन्हाळ्यात तुळस आणि कडुलिंबयुक्त फेसवॉशचा वापर करा.
उन्हाळा आहे म्हणून तुम्ही नेहमी वापरत असलेली क्रीम लावणे सोडू नका. तुम्ही नेहमी वापरत असलेल्या क्रीमने चेहऱ्यावर गोलाकार मसाज करा. बोटांनी मसाज करताना हलकासा दाब द्या. त्वचेत जेव्हा क्रीम नीट मुरेल तेव्हा चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा.