हिवाळ्यात प्रदुषणामुळे होतोय श्वसनाचा त्रास, 'अशी' घ्या काळजी

हिवाळ्यात धुकं दिसत असले तरी ते केवळ नैसर्गिक धुके नसून, प्रदूषणाचे एक गंभीर रूप आहे. उत्तर भारतात हिवाळ्याच्या महिन्यात प्रदूषणाची पातळी प्रचंड वाढत आहे. ज्यामुळे श्वसनसंबंधी विविध समस्या वाढत आहेत. या हिवाळ्यात दरम्याच्या 40% रुग्णांना खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होऊन रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे.  

- | Updated: Dec 24, 2024, 01:50 PM IST
हिवाळ्यात प्रदुषणामुळे होतोय श्वसनाचा त्रास, 'अशी' घ्या काळजी title=

इंडियन जर्नल ऑफ चेस्ट डिसीज अँड अलाईड सायन्सेसच्या संशोधनानुसार हिवाळ्यात हवेची खराब गुणवत्ता श्वसनाच्या रुग्णांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात थंडी आणि वायू प्रदूषणाचा संयोजन श्वसनसंस्थेवर गंभीर परिणाम करतो. थंडीमुळे प्रदूषणाचे कणं जमिनीजवळ राहतात, ज्यामुळे हवेची गुणवत्ता आणखी खराब होते. या प्रदूषणामुळे श्वसनमार्गात जळजळ होऊन रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते.

अ‍ॅलर्जी, खोकला, सर्दी आणि संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव
प्रदूषणामुळे अ‍ॅलर्जी, खोकला, सर्दी आणि श्वसनाच्या समस्या वाढत आहेत. ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे. खास करुन वृद्ध आणि लहान मुले त्यांनी अधिक काळजी घ्यावी. व्हायरल इन्फेक्शन आणि अ‍ॅलर्जीमुळे रुग्णालयांमध्ये श्वसनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.

वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या
दरवर्षी भारतात 20 लाख लोक वायू प्रदूषणामुळे मृत्यु होतो. हिवाळ्यात प्रदूषणाची पातळी अधिक असते, ज्यामुळे हृदयविकार, न्यूमोनिया, मानसिक आजार, फुफ्फुसाचा कर्करोग, आणि मोतीबिंदू यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. प्रदूषणामुळे श्वसनावर, हृदयावर, आणि इतर जीवनसत्त्वांवर दीर्घकालीन दुष्परिणाम होऊ शकतात.

 उपाययोजना
1. मास्क वापरा - बाहेर पडताना प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरणे महत्त्वाचे आहे.
2. एअर प्युरिफायरचा वापर करा - घरात एअर प्युरिफायर ठेवून हवेची गुणवत्ता सुधारू शकता.    
3. संतुलित आहार आणि कोमट पाणी - शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी संतुलित आहार घ्या आणि कोमट पाणी अधिक प्यावे.
4. प्रदूषणाच्या पातळीवर लक्ष ठेवा- प्रदूषणाची पातळी जास्त असताना सकाळी आणि संध्याकाळी बाहेर फिरणे टाळा.
5. योग आणि श्वासप्रश्वास व्यायाम - श्वसनाच्या व्यायामांनी फुफ्फुसांना अधिक मजबूत बनवू शकता.
6. वृद्ध आणि लहान मुलांची काळजी घ्या -  वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांना बाहेर जाण्यापासून दूर ठेवा, किंवा त्यांना सुरक्षेचे उपाय लागू करा.

प्रदूषणाचे परिणाम कमीत कमी करण्यासाठी या उपायांचा अवलंब करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रदूषणाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कडक नियम लागू करणे आवश्यक आहे आणि आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात या समस्येला गंभीरपणे घेऊन पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करण्याचा प्रयत्न करावा .

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही .कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)