रोज हजारो, तर तासाला 77 मृत्यू; 'या' 5 जीवाणूंमुळे भारतीयांचा जीव धोक्यात

भारतात दर दिवशी हजारो तर तासाला 77 मृत्यू, तुमच्या परिसरात ही असू शकतात 'हे'  5 जीवाणू... जीवाणू आणि त्यांच्यामुळे होणाऱ्या संसर्गामुळे वाढतोय मृत्यूचा धोका...  

Updated: Nov 23, 2022, 09:09 AM IST
रोज हजारो, तर तासाला 77 मृत्यू; 'या' 5 जीवाणूंमुळे भारतीयांचा जीव धोक्यात  title=

Five Bacteria Types : आपल्या अवती-भोवती असे अनेक जीवाणू (bacteria) असतात, जे आपल्याला दिसत नाहीत पण प्रचंड धोकादायक असतात. काही जीवणूंमुळे सार्दी, ताप, खोकला यांसारखे आजार होतात. पण काही जीवाणू आपल्या जीवावर बेतू शकतात. सायन्स जर्नल लॅन्सेटने अशाच काही 5 जीवाणूंबद्दल सांगितलं आहे. जे 2019 मध्ये फक्त भारतातच नाही तर, संपूर्ण जगात अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरले आहेत. (bacteria disease)

सायन्स जर्नल लॅन्सेटच्या रिपोर्टनुसार 'या' पाच (bacteria types) जीवाणूंमुळे जगभरात जवळपास 1.37 कोटींपेक्षा जास्त लोकांनी आपला जीव गमावला आहे. यामध्ये 33 जीवाणूंमुळे 77 लाख लोकांचा मृत्यू झाला असून, 55 टक्के लोकांचा मृत्यू 'या' पाच जीवाणूंमुळे झाला आहे. (harmful bacteria)

पाच धोकादायक जीवाणू कोणते? 
लॅन्सेटच्या रिपोर्टनुसार असे पाच जीवाणू आहेत, जे प्रचंड धोकादायक आहेत. ज्यामध्ये ई.कोलाई (E. coli), एस. न्यूमोनिया  (S. pneumoniae), के. न्यूमोनिया  (K. pneumoniae), एस. ऑरियस (S. aureus) आणि ए. बौमेनियाई (A. baumanii) या पाच जीवणूंचा समावेश आहे. (what is bacteria)

भारतात तासाला 77 मृत्यू
लॅन्सेटच्या रिपोर्टनुसार या पाच जीवाणूंमुळे 2019 साली भारतात 6.78 लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे. म्हणजे प्रत्येक दिवशी जवळपास 1 हजार 860  तर तासाला 77 लोकांचा बळी पाच जीवाणूंनी घेतला आहे. 

वाचा | Winter skincare : थंडीत दही बनवेल स्किनला आणखी सॉफ्ट...ड्राय स्किनची चिंताच विसरा

 

रिपार्टनुसार, या पाच जीवाणूंपैकी कोलाई सर्वात जास्त धोकादायक जीवणू आहे. कोलाई जीवाणूमुळे भारतात 2019 मध्ये 1.57 लाख पेक्षा जास्त लोकांनी आपला जीव गमावला आहे. जगभरातील मृत्यूचं दुसरं सर्वात मोठं कारण म्हणजे जीवाणूंमुळे होणारे संसर्ग... असं देखील स्टडीमध्ये सांगण्यात आलं आहे. ज्यामुळे आठ मृत्यूंपैकी एक मृत्यू या जीवाणूंमुळे होतो. 

स्टडीमध्ये काय समोर आलं आहे? 
स्टडीच्या माध्यमातून समोर आल्यानुसार 2019 जगभरात जेवढे मृत्यू झाले आहेत, त्यामध्ये 13.6 टक्के मृत्यू  जीवाणूंमुळे होणाऱ्या संसर्गमुळे झाले आहेत. लोअर रेस्पिरेटरी इन्फेक्शन (LRI), रक्तप्रवाहात संसर्ग (BSI) आणि पेरिटोनियल आणि इंट्रा-ओबडोमिनल इन्फेक्शन (IAA) या तीन सिंड्रोममुळे 75% पेक्षा जास्त मृत्यू झाले. 

संशोधकांचे म्हणण्यानुसार, एस. ऑरियस सिद्ध झालेल्या  सर्वात प्राणघातक जिवाणूंपैकी एक आहे.  एस. ऑरियसमुळे 11 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. आफ्रिकोत मृत्यू दर सर्वाधिक असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे.