Diabetes Diet Tips : 3 अशा गोष्टी ज्यांचं सेवन मधुमेहाच्या रुग्णांनी करायला हवे

Diabetes च्या रुग्णांना त्यांच्या आहारात खूप काळजी घ्यावी लागते अन्यथा साखरेची पातळी वाढू शकते.

Updated: Mar 25, 2022, 09:48 PM IST
Diabetes Diet Tips : 3 अशा गोष्टी ज्यांचं सेवन मधुमेहाच्या रुग्णांनी करायला हवे title=

Diabetes Diet Tips : सुक्या मेव्यामध्ये (Dry Fruits) अनेक प्रकारचे पोषकतत्व असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे असतात. जर तुम्ही त्यांचे नियमित सेवन करत असाल, तर शरीराला आवश्यक असलेले अनेक पोषण पूर्ण करण्यासाठी बाह्य पूरक आहार घेण्याची गरज नाही. मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या आहारात खूप काळजी घ्यावी लागते अन्यथा साखरेची पातळी वाढू शकते. तर आज आम्ही अशा 3 ड्रायफ्रुट्सबद्दल सांगणार आहोत जे मधुमेहाच्या रुग्णांनी जरूर सेवन करावे.

1. शेंगदाणे (Peanuts)

शेंगदाण्यामध्ये फायबर, हेल्दी फॅट्स, प्रथिने आणि अल्फा लिपोइक अॅसिड भरपूर असतात. हे सर्व पोषण मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. आहारात फायबरयुक्त पदार्थ जरूर खावेत, कारण ते रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्याबरोबरच पचनक्रिया व्यवस्थित ठेवतात, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

2. बदाम (Almonds)

मधुमेहाच्या रुग्णांसाठी बदाम महत्त्वाचे आहे, कारण त्यात मॅग्नेशियम आढळते. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासोबतच ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचेही काम करते. याशिवाय या ड्रायफ्रूटमध्ये व्हिटॅमिन-डी (Vitamin D) आणि कार्बोहायड्रेट्स फार कमी प्रमाणात असतात. याशिवाय यामध्ये आढळणारे उच्च चरबी, प्रथिने आणि फायबर हे मधुमेह नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

3. अक्रोड (Walnuts)

तिसरा ड्राय फ्रूट अक्रोड आहे, ज्याच्या सेवनाने मधुमेहाचे रुग्ण दीर्घकाळ निरोगी राहतील. कारण अक्रोडमध्ये फायबर देखील असते जे रक्तातील साखर वाढू देत नाही. साखर नियंत्रणात ठेवण्यासोबतच पचनसंस्थेशी संबंधित समस्याही दूर ठेवते. अक्रोडमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स (anti-oxidants) आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स (omega-3 fatty acids) देखील असतात, जे हृदयाला निरोगी ठेवतात आणि वृद्धत्वाचे परिणाम टाळतात.