मुंबई : दरवर्षी 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट जागतिक स्तनपान आठवडा म्हणून मानला जातो. याला पहिल्यांदा 1991 मध्ये साजरं करण्यात आलं होतं. त्यानंतर ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा स्तनपान आठवडा म्हणून साजरा केला जातो. या आठवड्याच्या निमित्ताने स्तनपानाविषयी जनजागृती करण्याचा हेतू असतो.
आईचं दूध हे बाळासाठी अमृत मानलं जातं. आईच्या दुधामुळे बाळाचं कुपोषण आणि अतिसार या गंभीर आजारांपासून संरक्षण होतं. इतकंच नव्हे तर स्तनपानामुळे महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर तसंच प्री-मोनोपॉजल गर्भाशयाचा कॅन्सरचा धोकाही कमी होतो.
डॉक्टर नेहमी नवजात बालकांना आईचं दूध पाजण्याचा सल्ला देतात. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर नेहमी बाळाला आईचं दूध द्यावं. आईच्या दुधात अँटी-ऑक्सिडंट्स आवश्यक पोषक तत्वं आढळतात, ज्यामुळे बाळाचे संपूर्ण शरीराचा विकास होण्यास मदत होतो. आईचे दूध हे बाळासाठी सर्वोत्तम आहार आहे.