मुंबई : चित्रपटसृष्टीत हीरो बनण्याचं स्वप्न घेऊन अनेक तरूण मुंबईत येतात. त्यातील काहीच मुलाचं स्वप्न पूर्ण होतं. काही वर्षांपूर्वी दिल्लीच्या करोल बागमध्ये राहणारा मुलगा मुंबईत हीरो बनण्याची इच्छा घेऊन आला. पण हीरोच्या जागी तो मुलगा बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील मोठा खलनायक झाला. तुम्ही ओळखलच असेल, नाही तर हा अभिनेता दुसरा कोणी नसून खलनायक आणि कॉमेडियन शक्ती कपूर (Shakti Kapoor) यांच्याविषयी बोलत आहोत. शक्ती कपूर यांचा एक वेगळाच रेकॉर्ड आहे, तो म्हणजे चित्रपटांमध्ये सर्वाधिक रेप सीन्स हे त्यांनी केले आहेत. 400 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलेल्या शक्ती कपूर यांनी जवळपास 80 चित्रपटांमध्ये बलात्काराचे सीन केले आहे. शक्ती कपूर आज 70 वर्षांचे झाले आहेत. (Shakti Kapoor 70th Birthday)
शक्ती कपूर जेव्हा हीरो बनण्यासाठी मुंबईत पोहोचले तेव्हा ते पेइंग गेस्ट म्हणून राहायचे. त्यानंतर अभिनेता विनोद खन्ना यांनी शक्ती कपूर यांना मदत केली. 5 महिने कोणतेही भाडं न घेता त्यांना घरात ठेवले.
शक्ती कपूर यांनी 1975 मध्ये रणजीत खनाल या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यांनी कन्नड, बंगाली, तामिळ आणि बांग्लादेशी चित्रपटांमध्येही काम केले आहे. शक्ती कपूर यांनी एक हीरो म्हणून मदीने की गलियां', 'जख्मी इंसान' आणि बेगुनाह' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. पण कॉमेडियन आणि खलनायकाच्या भूमिकांमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली.
शक्ती कपूर यांनी अनेक वादग्रस्त सीन्समध्ये काम केले. 'मेरे आगोश में' या चित्रपटामध्ये शक्ती कपूर एका टॉपलेस अभिनेत्रीसोबत ओरल सेक्स करताना दिसले. या सीनमुळे अनेक महिने या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डानं मंजुरी दिली नव्हती. (Shakti Kapoor Controversial Scene)