Ranveer Singh झाला Oops मूमेंटचा शिकार; Deepikaने अशी सांभाळली परिस्थिती

 दीपिका - रणवीर कायम त्यांच्या खास केमिस्ट्रीमुळे चर्चेत असतात. 

Updated: Apr 18, 2021, 12:25 PM IST
Ranveer Singh झाला Oops मूमेंटचा शिकार; Deepikaने अशी सांभाळली परिस्थिती  title=

मुंबई : बॉलिवूडचं पॉवर कपल म्हणजे अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण. दीपिका - रणवीर कायम त्यांच्या खास केमिस्ट्रीमुळे चर्चेत असतात. कधी दोघेही त्यांच्या प्रेमामुळे चर्चेत असतात, तर कधी त्यांच्या कपड्यांमुळे ट्रोल होतात. एकदा दर पार्टी दरम्यान रणवीर Oops मूमेंटचा शिकार  झाला तेव्हा दीपिकाने ती वेगळी परिस्थिती सांभाळली. दीपिकाने 'द कपिल शर्मा' शो दरम्यान पार्टीत घडलेला किस्सा सांगितला. पर्टीत घडलेल्या त्या किस्स्यामुळे दोघेही चर्चेत आले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Deepveer movies  (@chhapaak_83thefilm)

व्हिडिओमध्ये दीपिकाने सांगितलं की, 'रणवीरने ठिली पँट घतली होती. पार्टीमध्ये तो डान्स करत होता. तेव्हा डान्स करताना पँट फाटली. तेव्हा मी पटकन बॅगेतून सूई - धागा काढला आणि त्याची पँट शिवत होती.' दीपिकाने पार्टीमधील किस्सा कपिलच्या शोमध्ये सांगितल्यानंतर प्रेक्षक देखील पोट धरून हासू लागले. 

हा किस्सा कोणासही खोटा वाटेल, पण हे सांगितल्यानंतर कपिलच्या शोमध्ये दीपिकाने याचा पुरावा देखील दिला. त्यावेळी दीपिकाने त्या घटनेचे फोटो देखील दाखवले. शिवाय कपिलने दीपिकाचे भरभरून कौतुक केलं आणि रणवीरला भाग्यवान आहे, त्याला तुझ्या सारखी पत्नी मिळली. सध्या हा भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर तिफान व्हायरल होत आहे.