अमिताभ बच्चन यांचे स्टारडम आणि व्यक्तिमत्व जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करत आहे. त्यांची लोकप्रियता आणि चाहत्यांची संख्या ही प्रचंड आहे. बिग बींच्या चाहत्यांमध्ये त्यांच्या कॅरेक्टरचे आणि त्याच्या कामाचा नेहमीचं प्रभाव पाडतात. 'कौन बनेगा करोडपती' (KBC)मध्ये अमिताभ बच्चन नेहमीचं किस्से सांगत असतात आणि प्रेक्षकांना हसवतात. परंतु यावेळेस काही वेगळे झाले. केबीसीच्या 16व्या सीझनमध्ये एका स्पर्धकाने त्यांना असा एक मजेशीर किस्सा सांगितला, ज्यामुळे सुपरस्टार अमिताभ बच्चनही थक्क झाले.
स्पर्धक, जो एक कार सेल्समन आहे, त्याने होस्ट अमिताभ बच्चन यांना सांगितले की, त्याच्या शोरूममध्ये एक व्यक्ती आला होता, जी अमिताभ बच्चन यांच्यासारखा दिसत होता. 'तुमच्यासारखी दिसणारी ती व्यक्ती आमच्या शोरूममध्ये आली होती आणि लोकांना खात्री होती की अमिताभ बच्चनच आले आहेत,' असं स्पर्धकाने सांगितले. शोरूमच्या बाहेर अचानकच प्रचंड गर्दी जमली आणि ट्रॅफिक जाम होऊन रस्त्यावर गडबड झाली. लोक त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गडबड करत होते.
स्पर्धकाने पुढे सांगितले की, 'मी त्या व्यक्तीला पाहताना असे वाटले की मी अमिताभ बच्चन यांनाचं भेटत आहे.' यावर अमिताभ बच्चन हसत म्हणाले, 'माहित नाही, आमच्या नावावर काय चाललं आहे' या मजेशीर उत्तराने प्रेक्षकांनाही हसायला आले.
ही घटना केवळ अमिताभ बच्चनच्या प्रभावाचे प्रतीक आहे, तर त्यांच्या 'हमशकली'च्या लोकप्रियतेचेही एक उत्कृष्ट उदाहरण आहे. अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांमध्ये इतका विश्वास आहे की, एक साधा लूक देखील त्यांना बिग बीसारखा वाटतो. बिग बींनी या इंडस्ट्रीत जवळपास 50वर्षे ओलांडून गेली, परंतु त्यांची क्रेज बॉलिवूडमध्ये आजही आहे. त्यांचा अभिनयाने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यानाचं वेड लावले आहे. अमिताङ बच्चन यांना 'कल्की 2898 AD' या चित्रपटात पाहिले गेले.
'KBC 16' हा शो प्रत्येक आठवड्यात रात्री 9 वाजता सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होतो आणि SonyLIV वर देखील उपलब्ध आहे.