How To Get Rid Of Blackheads: आजकाल जवळपास सर्वचजण त्वचा मुलायम आणि चेहरा सुंदर दिसण्यासाठी खूप प्रयत्न करतात. यासाठी विविध घरगुती आणि आयुर्वेदिक उपचारांचा वापर करणे फायदेशीर ठरते. फक्त हिवाळ्यातच नाही इतर ऋतूंमध्येसुद्धा अनेकांसाठी ब्लॅकहेड्स हा चिंतेचा विषय असतो. ब्लॅकहेड्समुळे चेहऱ्यावर वाईट परिणाम होतो. ब्लॅकहेड्सपासून सुटका मिळवण्यासाठी बरेचजण बाजारातून स्क्रब विकत घेतात. परंतु, कधीकधी आपल्याला या स्क्रबचा हवा तसा परिणाम पाहायला मिळत नाही. स्क्रबचा चांगला परिणाम मिळवण्यासाठी घरगुती पदार्थ वापरुन तयार केलेला स्क्रब अत्यंत उपयुक्त आणि फायदेशीर ठरेल. घरगुती उपचारांमुळे अनेक समस्यांचे निवारण करता येते. तसेच, साखरेपासून बनवलेला स्क्रब हा चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स मिटवण्यासाठी अत्यंत फायद्याचे आहे.
जर तुमची त्वचा ड्राय असेल आणि यासाठी तुम्हाला चांगल्या परिणामकारक स्क्रबची आवश्यकता असेल तर नक्कीच साय आणि साखरेचा स्क्रब चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरेल. हा स्क्रब बनवणे खूप सोपे आहे. या स्क्रबच्या वापरामुळे तुमची त्वचा मुलायम तर होईलच पण त्यासोबत त्वचा उजळसुद्धा होईल.
सर्वप्रथम एका वाटीत या दोन गोष्टी चांगल्या तऱ्हेने मिसळा आणि त्याचे मिश्रण तयार करुन घ्या. आता या मिश्रणाला हलक्या हाताने आपल्या चेहऱ्यावर स्क्रब करा. यामध्ये तुम्ही बाजारातुन आणलेली मिल्क क्रिम वापरु शकता किंवा घरात असलेल्या दुधावरील सायीचा वापर करु शकता.
अंदाजे, पाच मिनिटे या मिश्रणाला चेहऱ्यावर स्क्रब करा आणि यानंतर पाच मिनिटे ते चेहऱ्यावर तसेच ठेवा.
दहा मिनिटांनंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
जर तुमच्या घरात साय उपलब्ध नसेल तर फक्त साखरेचा वापर तुम्ही स्क्रब म्हणून करु शकता. साखरेमुळे चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी मदत होते. तसेच, काही वेळ हे मिश्रण चेहऱ्यावर ठेवल्याने त्वचा नितळ आणि उजळ होण्यास मदत होते.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)