मुंबई : बिग बॉसच्या या सिझनमध्ये सगळ्यांना आश्चर्य करणारी ही घटना घडली आहे. आतापर्यंतच्या बिग बॉस सिझनमध्ये जे घडलं नाही ते यंदाच्या सिझनमध्ये पाहायला मिळालं आहे.
आतापर्यंत बिग बॉसच्या घरी चांगले मित्र एकमेकांची कट्टर शत्रू झाले होते. पण आता पहिल्यांदाच एकमेकांचे अगदी कट्टर शत्रू असलेले हे दोघं आता मैत्रीची भाषा करू लागले आहेत. आम्ही बोलत आहोत शिल्पा शिंदे ओआणओि विकास गुप्ता या दोघांबद्दल. आताच्या शोमध्ये या दोघांची मैत्री अगदी जगासमोर आळेली आहे.
सुरूवातीच्या काळात हे दोघे एकमेकांवर प्रचंड आरोप करायचे मात्र आता हे चित्र बदलताना दिसत आहे. त्याचं कारण ही तसंच आहे या दोघांना त्यांच्यातील मैत्री दाखवून देण्याचा टास्क देण्यात आला आहे. आणि हा टास्क पाहताना सारेच जण अचंबित होत आहेत.
विकासला जेव्हा शिल्पाला नॉमिनेशन टास्कमधून वाचवण्याची गोष्ट सांगण्यात आली तेव्हा विकासने आपल्या आवडीचं जॅकेट खराब करून शिल्पाला लगेच वाचवलं. हे जॅकेट त्याला त्याच्या कुटुंबियांनी दिलं होतं. आणि ते वाचवण्याचीच गोष्ट केली जात होती. एवढंच नाही तर विकासने शिल्पाला शब्द दिला आहे की तो इथून बाहेर गेल्यावर तिच्यासाठी काम शोधणार आहे.
आणि विकासचे हे शब्द ऐकताच शिल्पाच्या डोळ्यात अश्रू आले. तिने विकासला देखील सांगितले की माझ्यासाठी तू जॅकेट खराब करायला नको होतं.