मुंबई : भोळाभाबडा राणादा आणि पाठक बाई यांच्या प्रेमाची कहाणी असलेल्या तुनझ्यात जीव रंगला या मालिकेला चांगलाच प्रतिसाद मिळतोय. प्रेक्षकांनी या मालिकेला चांगली पसंती दर्शवलीये. या मालिकेतील पात्रेही लोकांना आवडतायत. ही मालिका टीआरपीमध्येही नंबर वन आहे. कोल्हापुरच्या वसगडे या गावात मालिकेचे शूटिंग सुरु आहे. या मालिकेसाठी सगळेच कलाकार खूप मेहनत घेतायत. संपूर्ण टीमचे खूप प्रयत्न असतात. या मालिकेने नुकतेच ५०० भाग पूर्ण केले. या निमित्ताने मालिका मसालामध्ये राणादाने सेटवरील वातावरण दाखवले. यावेळी मालिकेतील कलाकारांशी बातचीत केली.