The Rabbit House: हिमाचल प्रदेशच्या ग्रामीण भागात सेट केलेले 'द रॅबिट हाऊस' एक काव्यात्मक आणि गहन रहस्य सादर करते. ज्याने जगभरातील प्रेक्षक आणि समीक्षकांना मोहित केले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च कार्यक्रम हा एक उत्साही प्रसंग होता. ज्यामध्ये ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेले सीन आणि कथेचं कौतुक होत आहे.
'द रॅबिट हाऊस' हा चित्रपट 20 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. 25 वर्षांहून अधिक काळ म्यूचुअल फंड व्यवसायात असलेले अनुभवी आर्थिक उद्योग व्यावसायिक कृष्णा पांढरे यांच्या निर्मितीमध्ये पदार्पण होणार आहे. यावेळी ते म्हणाले की, 'सिनेमा हा नेहमीच माझ्या आवडीचा विषय राहिला आहे आणि 'द रॅबिट हाऊस' द्वारे मला अशी कथा आणायची होती जी भारतीय संस्कृतीशी निगडित आहे आणि त्याच वेळी सर्वंकषही आहे. हा चित्रपट माझ्यासाठी एक स्वप्न पूर्ण होण्यासारखा आहे'.
चित्रपटाच्या निर्मात्या सुनीता पांढरे यांचेही चित्रपटाच्या निर्मितीतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल कौतुक झाले. सेटवर तिच्या प्रेमळपणासाठी आणि मार्गदर्शनासाठी ओळखल्या जाणाऱ्या सुनीता म्हणाल्या, 'हा चित्रपट माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे आणि ट्रेलरला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाने मी भारावून गेले आहे. मला आशा आहे की प्रेक्षकही आमच्या टीमप्रमाणेच या चित्रपटाचा स्वीकार करतील.'
रिलीज होण्यापूर्वीच चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद
'द रॅबिट हाऊस' चित्रपटात पद्मनाभ गायकवाड, अमित रिया आणि करिश्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ज्यांनी या चित्रपटात अभिनय करून अद्भुत कथा जिवंत केली आहे. या कार्यक्रमात बोलताना, कलाकारांनी चित्रपटाच्या रिलीजबद्दल आनंद व्यक्त केला आणि या ऐतिहासिक प्रकल्पाचा एक भाग असल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक वैभव कुलकर्णी यांनी देखील आपले विचार मांडले. 'द रॅबिट हाऊस' ही एक कथा आहे, जी सांगण्याची गरज आहे. मला खूप आनंद झाला आहे की, या चित्रपटाला रिलीज होण्यापूर्वीच प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.