मुंबई : चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीत हिरोच्या तुलनेत हिरोईनला कमी पैसे मिळतात अशी नेहमीच चर्चा होताना दिसते. पण अलीकडेच, एका अभिनेत्रीने आजपर्यंतच्या भूमिकांसाठी अभिनेत्यापेक्षा जास्तच मानधन मिळालं असल्याचा दावा केला आहे.
बिग बॉस 15 ची विजेती तेजस्वी प्रकाशने खुलासा केला आहे की, तिने आतापर्यंत ज्या मालिकांमध्ये काम केले आहे, त्यात तिला अभिनेत्यापेक्षा जास्त पैसे मिळाले आहेत.
एका मुलाखतीत तेजस्वी म्हणाली, 'जर तुम्ही माझ्या वैयक्तिक अनुभवाबद्दल विचारत असाल, तर मी आतापर्यंत जे काही काम केले आहे, त्या सर्व मालिकांमध्ये मला मुख्य अभिनेत्यापेक्षा जास्त मानधन मिळाले आहे.
पुढे तेजस्वी म्हणाली," मला वाटतं की तुम्ही तुमच्या कामात किती चांगले आहात यावर ते अवलंबून आहे. तुम्ही चांगले काम करत असाल तर निर्माते तुम्हाला पैसे देतील."
"मी 8 किंवा 9 शोमध्ये काम केले आहे आणि फक्त दोन शो वगळता मला आतापर्यंत हिरोपेक्षा जास्त मानधन मिळालं आहे. कारण त्यांना मी काम करावे अशी इच्छा होती. मला वाटत नाही की तो मुलगा आहे म्हणून मुलांना जास्त पैसे दिले जात आहेत असे सांगून यावरुन तुम्ही सिस्टीमला दोष देऊ शकता."
आतापर्यंत सतत अभिनेत्रींना कमी मानधन मिळतं अशी चर्चा व्हायची, पण अगदी विरुद्ध अशा तेजस्वीच्या या वक्तव्यामुळे सगळीकडे एकच चर्चा सुरु झाल्याचं बोललं जात आहे.