Pushpa 2 Sandhya Theatre Stampede Case: साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला 'पुष्पा 2' या चित्रपटामुळे तुरुंगात जावे लागेल असा विचार देखील अल्लू अर्जुनने केला नसेल. अल्लू अर्जुन शनिवारी (14 डिसेंबर) रोजी तुरुंगातून बाहेर आला आहे. अल्लू अर्जुन तुरुंगातून बाहेर येताच कुटुंबीय आनंद साजरा करताना दिसले. अल्लू अर्जुनने देखील त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. शनिवारी रात्रीपर्यंत साउथमधील अनेक कलाकार अल्लू अर्जुनला भेटण्यासाठी त्याच्या घरी येत होते.
या सर्व घडामोडीनंतर आता अल्लू अर्जुनसोबत सर्व काही ठीक होईल असे त्याच्या चाहत्यांना वाटू लागले आहे. अल्लू अर्जुननेही पोलिस तपासात पूर्ण सहकार्य करणार असल्याचा दावा केला होता. मात्र, दरम्यान अल्लू अर्जुनच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे.
जखमी मुलाची प्रकृती खालावली
सिनेमागृहात झालेल्या चेंगराचेंगरीत एक महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता यातील एका मुलाची प्रकृती खूपच खालावली असल्याची बातमी समोर येत आहे. डॉक्टरांनी या 8 वर्षाच्या मुलाला व्हेंटिलेटरवर हलवले आहे. खुद्द रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या वृत्ताला मान्यता दिली आहे.
द हिंदूच्या रिपोर्टनुसार, रुग्णालयाने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, या मुलाला सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. मुलाची प्रकृती सध्या स्थिर आहे. व्हेंटिलेटरवर असलेल्या नळीद्वारे मुलाला अन्न दिले जात आहे. मुलाला सतत ताप येत असल्याने प्रकृतीत सुधारणा होत नाहीये. श्री तेज असे या 8 वर्षाच्या मुलाचे नाव आहे. या मुलावर सध्या हैदराबादच्या KIMS Hospital मध्ये उपचार सुरू आहेत. एकंदरीत, 'पुष्पा 2' पाहणे मुलाच्या कुटुंबासाठी चांगलेच महागात पडले आहे.
#AlluArjun #AlluArjunArrest pic.twitter.com/E3SQZnsC5b
— Fukkard (@Fukkard) December 14, 2024
अल्लू अर्जुन आणि संध्या थिएटरवर गुन्हा दाखल
चेंगराचेंगरीप्रकरणी अल्लू अर्जुन आणि संध्या थिएटरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थिएटरवर निष्काळजीपणचा आरोप करण्यात आला आहे. त्यावर 105 आणि 118(1) BNS कलम लागू करण्यात आले आहे. शुक्रवारी अल्लू अर्जुनला या प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला शनिवारी जामीन मिळाला.