Covid-19 : 'तारक मेहता का...' फेम अभिनेत्रीची इमारत सील

कोरोनाग्रस्त रुग्णांची सर्वात जास्त संख्या मुंबईत आहे.     

Updated: Apr 13, 2020, 08:02 PM IST
Covid-19 : 'तारक मेहता का...' फेम अभिनेत्रीची इमारत सील  title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसचा फैलाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवला आहे. महाराष्ट्रात एकट्या मुंबईमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्यंत वाढ होत आहे. दरम्यान  ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री सोनालिका जोशीची इमारत सील करण्यात आली आहे. इमारतीत राहण्याऱ्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यामुळे इमारत सील करण्याचा निर्णय बीएमसीने घेतला आहे. 

स्पॉट बॉयला दिलेल्या मुलाखतीत स्वत: सोनालिकाने या धक्कादायक बातमीचा खुलासा केला आहे. सोनालिका कांदिवली पूर्व भागात राहते. त्याच्या सोसायटीचा आसपासचा भाग २७ मार्च पासून सील करण्यात आला आहे. परंतू आता इमारतीतच रुग्ण आढळल्यामुळे रहिवास्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

New Sonu  #sonalikajoshi #like4like #cute #Actress #look #beauty #tmkoc #taarakmehtakaooltahchashmah #mandarchandwadkar #palaksidhwani

A post shared by Sonalika Joshi (@sonalikajoshi) on

यापूर्वी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील अभिनेता तन्मय वेकारियाची इमारत सील करण्यात आली होती. त्याचप्रमाणे 'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या सोसायटीमध्ये देखील कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हाणून येथील परिसर सील करण्यात आला आहे. 

अंकिताच्या इमारतीत राहणारा हा व्यक्ती स्पेनवरुन भारतात परतला होता. या सोसायटी मध्ये अंकिताशिवाय अशिता धवन, नताशा शर्मा, मिश्कत वर्मा यांसारखे सिलिब्रिटी राहतात. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.