मुंबई : संपूर्ण महाराष्ट्र ज्या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात तो सोहळा म्हणजे झी चित्र गौरव सोहळा. नुकताच हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. अनेक कलाकारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. अनेक कलाकारांनी या सोहळ्यात ग्लॅमरस पद्धतीने हजेरी लावली होती. तर राजकीय नेतेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. संपुर्ण मराठी सिनेसृष्टी या कार्यक्रमाला उपस्थित होती. असं असताना मग बॉलिवूड इंडस्ट्री या कार्यक्रमात मागे कशी राहिल. या कार्यक्रमाच्या निमीत्ताने अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि सारा अली खान या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या.
मराठी चित्रपटसृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते असा प्रतिष्ठित ‘झी गौरव २०२४’ गौरव सोहळा मोठ्या धमाकेदार पद्धतीने साजरा झाला, यावर्षीच्या झी चित्र गौरव २०२४ सोहोळ्याच खास आकर्षण म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतल्या दोन अशा अभिनेत्री ज्यांनी आपल्या नृत्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्या अभिनेत्री म्हणजे ‘शिल्पा शेट्टी’ जी आपल्या स्टाईलसाठी नेहमी चर्चेत असते आणि दुसरी 'सारा अली खान'. साराने 'ऐका दाजीबा' म्हणत उपस्थित पाहुण्यांचं लक्ष वेधून घेतलं, तसेच 'आँख मारे' ह्या गाण्यावर केलेल्या तडकत्या फडकत्या नृत्याने मंचावर आग लावली. तर शिल्पा शेट्टी सादर केलेल्या लावणीने हा सोहळा वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला. तेव्हा 'सारा अली खान' आणि 'शिल्पा शेट्टीच्या' तालावर नाचायला तयार राहा आणि त्यांचा धमाकेदार परफॉर्मन्स पाहायला विसरू नका 'झी चित्र गौरव पुरस्कार २०२४' शनिवार १६ मार्च संध्या. ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.
तर या वर्षीचा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा हा खूप गाजणार आहे. कारण बॉक्स ऑफिसवर हे वर्ष खऱ्या अर्थाने महिलांनी गाजवले मग तो 'बाईपण भारी देवा' सारखा चित्रपट असू दे किंवा मग 'झिम्मा २'. या पुरस्कार सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 'जीवनगौरव पुरस्कार’, ह्यावर्षी या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरल्या त्या ‘उषाताई मंगेशकर’. तर ह्यावर्षीच्या 'मराठी पाऊल पडते पुढे’ पुरस्काराची मानकरी ठरली ती म्हणजे 'प्रिया बापट'. तसेच ह्या सोहळ्यात हिंदी चित्रपटसृष्टीतल्या दोन अशा अभिनेत्रींनी उपस्थिती लावली ज्यांनी आपल्या नृत्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.