शिल्पा शेट्टीचा नवा गेम शो लवकरच छोट्या पडद्यावर....

अभिनेत्री शिल्पा शेट्टी छोट्या पडद्यावर आपल्या पहिलावहिला लाईव्ह गेम शो घेऊन येत आहे. या शो चे पोस्टर बुधवारी शिल्पाने ट्विटरवर शेयर केले.  शेयर करताना कॅप्शनमध्ये तिने लिहिले होते की, "कारची इच्छा वाया नाही जाणार ! आता कमीतकमी पैशात प्रत्येक आठ्वड्यात अँटी तुम्हाला कार देईल." शो ची टॅगलाईन आहे, 'अँटी बोली लगाओ बोली : सबसे कम सबसे अनोखी'. या पोस्टरमध्ये शिल्पासोबत कॉमेडीयन अर्चना पूरन सिंह देखील दिसत आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 6, 2017, 07:21 PM IST
 शिल्पा शेट्टीचा नवा गेम शो लवकरच छोट्या पडद्यावर.... title=

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी छोट्या पडद्यावर आपल्या पहिलावहिला लाईव्ह गेम शो घेऊन येत आहे. या शो चे पोस्टर बुधवारी शिल्पाने ट्विटरवर शेयर केले.  शेयर करताना कॅप्शनमध्ये तिने लिहिले होते की, "कारची इच्छा वाया नाही जाणार ! आता कमीतकमी पैशात प्रत्येक आठ्वड्यात अँटी तुम्हाला कार देईल." शो ची टॅगलाईन आहे, 'अँटी बोली लगाओ बोली : सबसे कम सबसे अनोखी'. या पोस्टरमध्ये शिल्पासोबत कॉमेडीयन अर्चना पूरन सिंह देखील दिसत आहे. 

हा शो २४ सप्टेंबरला कलर्स चॅनलवर प्रसारीत होईल. त्याचबरोबर ट्विटरवर शिल्पाने लिहिले, "हे माझे पहिले टीव्ही प्रॉडक्शन आहे. धन्यवाद राज नायक, कलर्स टीव्ही, अर्चना पूरन सिंह. हा भारतातील पहिला लाईव्ह गेम शो आहे, ज्यात प्रेक्षकांना देखील कार जिंकण्याची संधी मिळेल."

यापूर्वी शिल्पाने अनेक रियालिटी शो मध्ये जज म्हणून काम पाहिले आहे. २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय टीव्ही शो 'सेलिब्रिटी बिग ब्रदर' जिकल्यानंतर सातत्याने ती मनोरंजन व्यवसायात सक्रीय आहे.