Salman Khan On His Days In Jail : बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान हा जवळपास गेल्या 3 दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. सलमाननं मेहनत करत स्वत: चं स्थान निर्माण केलं. सलमाननं पुतण्या अरहान खानच्या पॉडकास्ट शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी सलमान खाननं खुलासा केला की दिवसातून फक्त दोन तास झोपतो. त्यासोबत त्यानं लोकांना खूप मेहनत करण्याचा सल्ला दिला. यानंतर त्यानं त्याच्या तुरुंगातील दिवसांविषयी सांगितलं की त्यावेळी तो तिथे खूप झोपला.
सलमान खाननं यावेळी सांगितलं की तो फक्त दोन तास झोपतो. महिन्यातून फक्त एकदाच तो 7-8 तास झोपू शकतो. कधी-कधी असं होतं की जेव्हा सेटवर शॉट तयार होत असतो तेव्हा त्या ब्रेकमध्ये काही मिनिटांसाठी तो झोपतो.
सलमाननं आपल्या आयुष्यात खूप मेहनत आणि शिस्तीचं महत्त्व सांगितलं आहे. तो म्हणाला की 'कारण देऊन कधी यशस्वी होता येत नाही त्यामुळे फक्त आपल्यात रस्त्यात अडथळे निर्माण होतात. सलमान म्हणाला, मी दमलोय असं वाटलं की लगेच उठायचं... मग त्यावेळी तुम्ही कितीही थकलेले असो. झोपो नका. काही असं करा जेणे करून अजून दमाल आणि मग शांतीत झोप येईल. मी फक्त दीड-दोन तास झोपतो आणि कधी-कधी महिन्यातून एकदा फक्त 7 तास झोपतो.'
पुढे सलमान म्हणाला, 'कधी-कधी मला शॉट्सच्यामध्ये पाच मिनिटांचा ब्रेक मिळतो तेव्हा खुर्चीवरच मी झोपतो. अशी जागा, जिथे मी काही काम नाही करु शकत... उदाहरण जेव्हा मी तुरुंगात होतो. तेव्हा मी खूप झोपलो. कारण मी तिथे काहीच करू शकत होतो. जेव्हा विमानात सगळा गोंधळ सुरु असतो तेव्हा मी शांत झोपतो. तर जेव्हा केव्हा कुटुंबात कामावरून चर्चा होते, तेव्हा तुम्ही जी काही मेहनत करतात, जे वाटतंय ते दाखवायला हवं. तुम्ही कायम तुमचं काम, मित्र आणि कुटुंबासोबत रहायला हवं.'
हेही वाचा : अरबाज आणि मलायकाच्या घटस्फोटावर सलमान खानचं वक्तव्य; पुतण्याला दिला 'हा सल्ला
दरम्यान, सलमाच्या कामाविषयी बोलायचं झालं तर सलमान खान आता एआर मुरुगदॉस यांच्या 'सिकंदर' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट यंदाच्या वर्षी ईदच्या निमित्तानं प्रदर्शित होणार आहे. त्यात सलमानसोबत रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या वर्षी सलमानच्या वाढदिवसाच्या निमित्तानं टीझर प्रदर्शित करण्यात आला होता.