'त्या' एका गोष्टीमुळेच काही मिनिटांत आईनं सैफ अली खानच्या हातात दिला Kareena चा हात!

त्यामुळे त्यांची प्रेमकहाणी कुठल्याच परिकथेपेक्षा कमी नाही. 

Updated: Oct 5, 2022, 05:15 PM IST
'त्या' एका गोष्टीमुळेच काही मिनिटांत आईनं सैफ अली खानच्या हातात दिला Kareena चा हात! title=

Kareena Kapoor and Saif Ali Khan: दहा वर्षांपुर्वी सैफ अली खान आणि करिना कपूर (Saif Ali Khan & Kareena Kapoor Marriage) यांनी लग्न केलं. सैफ अली खानपुर्वी करिना आणि शाहीद कपूरच्या (Shahid Kapoor and Kareena Kapoor) अफेअरची खूप चर्चा होती. परंतु काही कारणांनी त्याचं ब्रेकअप झालं. करिनापुर्वी सैफ अली खान आणि अमृता सिंगच्या लग्नाची चर्चा जगजाहीर होती. सैफ अली खान आणि अमृता यांना सारा अली खान आणि अब्राहम अली खान (Abrahim Ali Khan) अशी दोन मुलंही आहेत. (saif ali khan convinced kareena kapoor mother for marriage babita gives permission)

परंतु शाहीद - करिना आणि सैफ अली खान - अमृता (Saif Ali Khan and Amrita Singh) एकमेकांपासून वेगळे झाले असले तरी आज सैफ अली खान आणि करिना कपूर ही बॉलीवूडमधील प्रसिद्ध जोडी आहे. त्यामुळे त्यांची प्रेमकहाणी कुठल्याच परिकथेपेक्षा कमी नाही. 

याआधी सैफने 1991 मध्ये इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सिंगसोबत (Actress Amrita Singh) लग्न केले होते. आपल्या या पहिल्या लग्नाच्या वेळी सैफने बॉलिवूडमध्ये पदार्पणही केले नव्हतं तर अमृता त्यावेळी इंडस्ट्रीतील मोठी अभिनेत्री होती. सैफ आणि अमृता यांच्या वयात मोठा फरक होता. सैफ वयाने अमृतापेक्षा 13 वर्षांनी लहान होता. (Saif Ali Khan and Amrita Singh Age Gap) त्यांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुलं आहेत. (Sara Ali Khan) 
 
लग्नाच्या काही वर्षानंतर सैफ आणि अमृता यांच्यातील दुरावा वाढू लागला होता. लग्नाच्या 13 वर्षानंतर सैफ आणि अमृता (Saif Ali Khan Divorce) 2004 मध्ये घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळे झाले. त्यानंतर 2008 मध्ये 'टशन' (Tashan) चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सैफ आणि करीना यांच्यात जवळीक वाढू लागली होती. करिना आणि सैफ अली खानमध्येही वयाचं अंतर आहे. सैफ करिनापेक्षा दहा-बारा वर्षांनी मोठा आहे. (Kareena Kapoor and Saif Ali Khan Age Gap) 

त्यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केले, त्यानंतर 2012 मध्ये त्यांनी लग्न केले. डेटिंग करत असताना सैफ अनेकदा करीनाला तिच्या घरी सोडायला जायचा. करिनाच्या आईच्या (Kareena Kapoor Mother) ही गोष्ट लक्षात आली. एकमेकांना डेट करत असलेल्या या दोघांना आता त्यांच्या आईवडिलांना त्यांच्याबद्दल सांगण्याची वेळ आली होती. 

जेव्हा सैफ करिनाच्या घरी करिनाच्या आईला भेटण्यासाठी गेला होता तेव्हा सैफनं करिनाच्या आईला असं काही सांगितलं की सैफचं बोलणं ऐकून करिनाच्या आईनं त्यांच्या लग्नाला क्षणार्धात होकार दिला. 

 
 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

करिनानं एका मुलाखतीत असा खुलासा केला होता की, सैफनं त्याच्या आईला सांगितलं की तो काही 25 वर्षांचा मुलगा नाही जो रोज रात्री त्याला सोडण्यासाठी घरी येतो. माझं करिनावर खरोखरच प्रेम आहे आणि मला माझं उर्वरित आयुष्य करिनासोबत घालवायचे आहे. त्यातून महत्त्वाचं म्हणजे आम्हाला एकत्र रहायचे आहे. सैफचे फक्त हे चार शब्द ऐकून करीनाच्या आईने घाईघाईत होकार दिला.