'पुष्पा 2' नंतर 'गेम चेंजर'चा डंका, रिलीजपूर्वीच चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून केली 'इतक्या' कोटींची कमाई

सुपरस्टार राम चरणचा 'गेम चेंजर' चित्रपट 10 जानेवारीला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून मोठी कमाई केली आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Jan 7, 2025, 03:54 PM IST
'पुष्पा 2' नंतर 'गेम चेंजर'चा डंका, रिलीजपूर्वीच चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून केली 'इतक्या' कोटींची कमाई title=

Game Changer Advance Booking: साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा 'पुष्पा 2' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना झाला असला आणि बॉक्स ऑफिसवर चित्रपटाबाबत अजूनही क्रेझ बघायला मिळत आहे. अशातच आता सर्वांच्या नजरा सुपरस्टार राम चरणच्या 'गेम चेंजर' या चित्रपटाकडे लागल्या आहेत. हा चित्रपट 10 जानेवारीला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या चित्रपटात राम चरणसोबत अभिनेत्री कियारा आडवाणी आणि एसजे सूर्या दिसणार आहेत. दरम्यान, 'पुष्पा 2' चित्रपटानंतर आता राम चरणच्या 'गेम चेंजर' या चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून प्रचंड कमाई केली आहे. 

रिपोर्टनुसार, काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अशातच 'गेम चेंजर'च्या प्री-रिलीज कलेक्शनमध्ये देखील प्रचंड वाढ झाली आहे. अशातच आता अमेरिकेतील सर्वात मोठ्या सिनेमा साखळ्यांपैकी एक असलेल्या AMC ने देखील या चित्रपटासाठी आपले दरवाजे उघडले आहेत. यामुळे या चित्रपटाचा वेग वाढेल अशी अपेक्षा आहे. 

अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून प्रचंड कमाई 

काही व्यापार तज्ञांचा अंदाज आहे की, 'गेम चेंजर' हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात कमाई करेल. आतापर्यंत 'गेम चेंजर' चित्रपटाने उत्तर अमेरिकेत 5.35 कोटी रुपये कमावले आहेत. 'गेम चेंजर' चित्रपटाची अ‍ॅडव्हान्स बुकिंग आजपासून भारतात सुरु झाली आहे. आतापर्यंत 65 लाख रुपयांची तिकिटे विकली गेली आहेत. अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये हा चित्रपट आज 1 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

'गेम चेंजर' या चित्रपटाचा दिग्दर्शक शंकर आहे. हा चित्रपट त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण त्याचा मागील चित्रपट 'इंडियन 2' बॉक्स ऑफिसवर प्रचंड फ्लॉप ठरला होता. त्यामुळे 'इंडियन 3' थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तथापि, शंकरला आशा आहे की 'गेम चेंजर'च्या यशामुळे 'इंडियन 3'च्या थिएटरमध्ये रिलीज होण्याचा मार्ग मोकळा होईल. 'गेम चेंजर' हा चित्रपट 10 जानेवारीला रिलीज होणार आहे.