पत्रलेखाकडून दीपिका पदुकोणच्या रिसेप्शनमधील लूकची कॉपी, पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. 

Updated: Nov 16, 2021, 10:50 PM IST
पत्रलेखाकडून दीपिका पदुकोणच्या रिसेप्शनमधील लूकची कॉपी, पाहा फोटो title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतर दोघांनी चंदीगडमध्येच एका रिसेप्शन पार्टीत आयोजित केली होती. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी या रिसेप्शन पार्टीचा एक सुंदर फोटो शेअर करून या कपलचं अभिनंदन केलं आहे. लग्नानंतर रिसेप्शनचा पहिला फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

फोटो समोर येताच पत्रलेखाचा लूकही खूप चर्चेत आहे. पत्रलेखाचा हा लूक पाहून सर्वांनाच दीपिका पदुकोणचा रिसेप्शन लूक आठवतोय. दोघांनी सिल्क साडी आणि हेवी चोकर नेकलेसमध्ये त्यांचा रिसेप्शन लूक पूर्ण केला. यासोबतच कपळात सिंदूर आणि कपाळावरच्या बिंदीपासून हेअरस्टाइलपर्यंत दोघांचा लूक अगदी सारखाच दिसतोय. ट्विटरवर फोटो शेअर करत मनोहर लाल खट्टर यांनी लिहिलं, "चंदीगड येथे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या लग्न समारंभाला उपस्थित राहून वधू-वरांना आशीर्वाद आणि यशस्वी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा."

या दोघांची शनिवारी चंदीगडमध्ये एंगेजमेंट झाली होती. 2010 पासून एकत्र दिसणारे राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी न्यू चंदीगड येथील ओबेरॉय सुखविलास स्पा रिसॉर्टमध्ये पार्टी केली. फिल्ममेकर फराह खान आणि अभिनेता साकिब सलीम व्यतिरिक्त त्यांच्या काही जवळच्या मित्रांनी पार्टीला हजेरी लावली होती.