8 वर्षांनंतर पुन्हा भारतीय सिनेमात झळकणार प्रियंका चोप्रा; राजामौलींच्या चित्रपटात करणार काम

जगभरात आपल्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही तब्बल 8 वर्षांनंतर भारतीय चित्रपटात दिसणार आहे. प्रियंका सुप्रसिद्ध निर्देशक एस. एस. राजामौली यांच्या चित्रपटाचा हिस्सा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

Updated: Dec 28, 2024, 11:50 AM IST
8 वर्षांनंतर पुन्हा भारतीय सिनेमात झळकणार प्रियंका चोप्रा; राजामौलींच्या चित्रपटात करणार काम title=
(photo credit - social media)

Priyanka Chopra Mahesh Babu Film: ' बाहुबली' आणि 'आरआरआर' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे एस. एस. राजामौली पुन्हा चर्चेत येत आहेत. सध्याच्या काळात ते एका नवीन प्रोजेक्टच्या तयारीत व्यस्थ असल्याची माहिती समोर आली आहे. मिडीया रिपोर्टनुसार समोर आलेल्या या माहितीत सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही राजामौलींच्या या नवीन प्रोजेक्टचा हिस्सा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

प्रियंका चोप्राने फक्त बॉलिवुडच नव्हे तर हॉलिवुड सिनेसृष्टी गाजवत असल्याचं सर्वांनाच माहित आहे. प्रियंकाने हॉलिवूड, बॉलिवूड सोबत दक्षिणात्य चित्रपटात सुद्धा काम केले आहे.  त्यामुळे आता पुन्हा 8 वर्षानंतर राजामौलींच्या प्रोजेक्टचा ती हिस्सा होणार असल्याने प्रियंकाच्या चाहत्यांमध्ये सुद्धा चर्चा रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राजामौलींच्या या चित्रपटाचं शूटींग पुढील वर्षी म्हणजेच एप्रिल 2025 मध्ये सुरू होणार आहे. प्रियंकासोबत या सिनेमात सुप्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेता सुद्धा दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

पिंकविलाच्या एका रिपोर्टनुसार, या चित्रपटात प्रियंकासोबत दक्षिणात्य सिनेमातील सुपरस्टार महेश बाबू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची स्क्रिप्ट तयार झालेली असून याची शूटींग एप्रिल 2025 मध्ये सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे. प्रसिद्ध निर्देशक एस. एस. राजामौली या प्रोजेक्टसाठी अशा अभिनेत्रीच्या शोधात होते जीने भारतातच नव्हे तर जगभरात आपला ठसा उमटवला असेल. यानंतर ते जगभरात लोकप्रिय असलेल्या प्रियंका चोप्रासोबत त्यांच्या प्रोजेक्टबद्दल बोलले. चित्रपटाच्या मेकर्स सोबतच्या तिच्या मिटींगनंतर तिने या सिनेमात काम करण्यासाठी होकार दिला.

8 वर्षांनंतर भारतीय सिनेमात झळकणार प्रियंका

सध्या तरी या चित्रपटाबद्दल स्वत: प्रियंका चोप्रा किंवा राजामौलींनी काही सांगितलं नाहीये परंतु जर प्रियंका या सिनेमात काम करणार असेल तर तब्बल 8 वर्षांनी ती भारतीय चित्रपटात पुन्हा दिसेल. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'द स्काय इज पिंक' या चित्रपटात ती शेवटची दिसली होती आणि यानंतर आता ती राजामौलींच्या नवीन सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच हा चित्रपट 2027 मध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे तसेच या सिनेमाचं शूटींग भारत आणि अमेरिका या देशांमध्ये होणार आहे. 

2027 पर्यंत प्रदर्शित होणार सिनेमा

या चित्रपटातील काही भाग आफ्रिकेतील जंगलात शूट होणार तसेच या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन सुद्धा दिसणार असल्याची चर्चा रंगत आहे. परंतु याबाबतीत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाहीये. ही माहिती समोर आल्यानंतर 'देसी गर्ल' प्रियंका चोप्राच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाल्याचं दिसत आहे तसेच तिचे चाहते तिला पुन्हा एकदा भारतीय सिनेमामध्ये बघण्यासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळतंय.