मुंबई : काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बायोपिकचं "पहिलं पोस्टर' रिलीज झालं. यामधून अभिनेता विवेक ओबेरॉय मोदींची भूमिका साकारणार असल्याचं स्पष्ट झालं. सिनेमाने शुटिंग सुरू होण्याअगोदरच चर्चेत राहायचं ठरवलं आहे. पोस्टर प्रदर्शित होताच अनेकांची उत्सुकता वाढली आहे. कारण निवडणूकांच्या काळात अनेक नेत्यांवर आधारित बायोपिक समोर येत असताना आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील बायोपिक येत आहे. आतापर्यंतच्या पंतप्रधानांपैकी मोदी एक असे पंतप्रधान आहेत जे आपल्या कार्यकाळात कायमच चर्चेत राहिले आहेत. लवकरच या सिनेमाचं शुटिंग सुरू होणार आहे. या सिनेमाकरता दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी खास तयारी केल्याचं देखील समोर आलं आहे.
ओमंग कुमारने गुजरातमधील त्या भागांचा दौरा केला जिथे नरेंद्र मोदींच बालपण गेलं आहे. लवकरच सिनेमाचं शुटिंग पूर्ण होणार आहे. त्यामुळे सिनेमाच्या चित्रिकरणाकरता ओमंग आणि त्यांची संपूर्ण टीम गुजरातमध्ये गेली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ओमंगला अहमदाबाद, वडनगर जिथे मोदींच बालपण गेलं आहे तो परिसर महात्वाचा वाटतो. तसेच अहमदाबादमधील 'हाऊस ऑफ एमजी' ही जागा देखील महत्वाची वाटते.
मुख्य भूमिकेसाठी विवेक ओबेरॉयची निवड करण्यामागची अनेक कारण आहेत. सर्वात अगोदर या भूमिकेसाठी एक अनुभवी अभिनेता आणि उत्तम कलाकार हवा होता. विवेक गेली 18 वर्षे या क्षेत्रात काम करत आहे. विवेक एक असा कलाकार आहे ज्याने 'कंपनी' आणि 'साथिया' सारख्या सिनेमांमध्ये वैविध्यपूर्ण काम केलं आहे. काही दिवसांपूर्वी परेश रावल यांच नाव चर्चेत होतं. त्याबद्दल सिंह म्हणाले की, मी 2014 पासून ऐकतोय की, या सिनेमाकरता परेश रावल असणार आहेत. पण आम्ही या अगोदर कधीच परेश रावल यांच्याशी यासंबंधी संपर्क केला नव्हता.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेकरता विवेक ओबेरॉयची निवड झाली असून या सिनेमाचं शुटिंग देशभरात होणार आहे. या बायोपिकमध्ये मोदींचा सुरूवातीचा काळ ते त्यांचा मुख्यमंत्रीपर्यंतचा प्रवास तर आहेच. तसेच 2014 च्या लोकसभा निवडणूकीत मोदींना पंतप्रधान पदासाठी निवडण्यात आलं तोपर्यंतचा प्रवास या सिनेमात दाखवण्यात येणार आहे. या सिनेमाबाबत सामान्यांना अधिक उत्सुकता आहे.