एअरपोर्टवर रडताना दिसली अजय देवगन-काजोलची लेक ? पाहा व्हायरल फोटो...

काजोल आणि अजय देवगन (Ajay Devgn) ची मुलगी न्यासा देवगन  (Nysa Devgan).न्यासा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

Updated: Jan 3, 2023, 04:53 PM IST
एअरपोर्टवर रडताना दिसली अजय देवगन-काजोलची लेक ? पाहा व्हायरल फोटो... title=

मुंबई : सेलिब्रिटींप्रमाणेच चाहत्यांना त्यांच्या मुलांबद्दल जाणून घ्यायला नेहमी आवडतं. कलारांप्रमाणेच स्टारकिड्सही नेहमी चर्चेत असतात. यात सगळ्यात जास्त चर्चेत नाव असतं ते म्हणजे, काजोल आणि अजय देवगन (Ajay Devgn) ची मुलगी न्यासा देवगन  (Nysa Devgan).न्यासा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

कधी ती पार्टीत स्पॉट होते तर कधी तिचा एअरपोर्ट लूक समोर येतो. नुकतीच न्यासाने न्यू ईयरची पार्टी केली. ज्यमध्ये तिने ब्लॅक कलरचा ड्रेस परिधान केला होता. याचदरम्यान रात्री अशिरा अजय देवगनची मुलगी न्यासा एअरपोर्टवर स्पॉट झाली. ज्याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.नुकतीच न्यासा रात्री उशिरा एअरपोर्टवर स्पॉट झाली. यावेळी तिला पापाराझींनी कॅमेरात कैद केलं. मग काय फोटो समोर येताच ते व्हायरल होऊ लागले  

न्यासा देवगनचे फोटो व्हायरल 
न्यासा देवगणचे हे फोटोज इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करताना चाहते काजोलच्या मुलीचे कौतुक करत आहेत. यावेळी न्यासा देवगन कॅज्युल ड्रेसमध्ये दिसली. या लूकमध्ये न्यासाचं सौंदर्य खुलून दिसत होतं. तिचा हा लूक लोकांना खूप पसंत आला होता.

अजय देवगणची लेक या लूकमध्ये खूपस सुंदर दिसत होती
कृपया आम्ही तुम्हाला सांगतो की, न्यासा देवगन खूप बोल्ड आणि सुंदर दिसत आहे. पण काल ​​रात्री जेव्हा ती मोकळ्या केसांमध्ये दिसली तेव्हा सगळेच घायाळ झाले. न्यासाची ही स्टाईल पाहून तिचे चाहते खूश झाले आहेत.

मात्र यावेळी तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन थोडे वेगळे दिसले. यावेळी अभिनेत्री थोडी नारज दिसत होती असं चाहत्यांचं म्हणणं आहे. या फोटोवर कमेंट्स करत चाहते म्हणत आहेत की, 'सारा यावेळी नाराज का दिसत आहे? काय झालंय' तर काही चाहते तिला विचारत आहेत की, अशी का वेळ आली अजय-काजोलच्या लेकीवर की, ती रडताना दिसत आहे? अशा प्रकारच्या अनेक कमेंट्स युजर्स न्यासाच्या या फोटोंवर करत आहेत.

अजय देवगणची मुलगी न्यासा देवगनचे चाहते तिच्या बॉलिवूड डेब्यूची वाट पाहत आहेत. मात्र, ती अद्याप मोठ्या पडद्यावर दिसलेली नाही. आता न्यासा देवगन अभिनयाच्या दुनियेत कधी धमाल करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.