मुंबई : अभिनेता नाना पाटेकर आणि सुपरस्टार रजनीकांत हे दोन मराठीमोळे दिग्गज अभिनेते आगामी तमिळ चित्रपट 'काला' यात एकमेंकाविरोधात उभे ठाकले आहे.
या चित्रपटात नाना एक कठोर, क्रूर राजकारण्याच्या भूमिकेत आहे. ही खूप शक्तीशाली भूमिका आहे. यात प्रेक्षकांना नाना आणि रजनीकांत यांच्या प्रेम आणि प्रचंड संघर्ष पाहायला मिळणार आहे.
काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर 'काला' चित्रपटाच्या शुटिंगचे फोटो लीक झाले होते. या चित्रपट नाना पाटेकर यांच्या राजकीय पक्षाचा रजनीकांत विरोध करतात. तसेच तमिळांना मुंबईत समान अधिकाराची मागणी करतात. धनुष याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रजनीकांत मलिन बस्तीच्या दबंगची भूमिका निभावली आहे.
मुंबईत या चित्रपटाचा एक भाग शूट झाल्यानंतर पुढील भागाच्या शुटींगसाठी रजनीकांत मुंबईत येणार आहेत. या चित्रपटात हुमा कुरैशी, अंजली पाटील, समुथिराकानी आणि पंकज त्रिपाठी यांचा समावेश आहे.
या चित्रपटात धनूष एक छोट्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले. हा चित्रपट हिंदी आणि तेलगूमध्ये रिलीज होणार आहे.