Malaika - Arbaaz च्या Divorce चं कारण आलं समोर..., एका सवयीनं घटस्फोट घडला

मलायका सध्या अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. 

Updated: Sep 24, 2022, 05:48 PM IST
Malaika - Arbaaz च्या Divorce चं कारण आलं समोर..., एका सवयीनं घटस्फोट घडला title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका ही नेहमी तिच्या आणि अभिनेता अर्जुन कपूरच्या (Arjun Kapoor) रिलेशनशिपमुळे चर्चेचा विषय ठरते. तरी देखील त्यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. अर्जुनसोबत रिलेशनशिपमध्ये (Malaika And Arjun Kapoor Relationship) येण्याआधी मलायकाचं बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan's Brother Arbaaz Khan) भाई अरबाज खानसोबत लग्न झालं होतं. मलायका एक घटस्फोटीत आहे. तरी देखील मलायका आणि अरबाज त्यांच्या मुलासाठी नेहमीच एकत्र येताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच त्यांचा विमानतळावरील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. 

आणखी वाचा : तो अचानक आर्चीच्या घरी आला...; रिंकु राजगुरुनं सांगितला 'तो' भयानक अनुभव

मलायका आणि अरबाज हे 1998 साली लग्न बंधनात अडकले होते. लग्नाच्या 18 वर्षांनंतर ते विभक्त झाले. त्या दोघांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक होती. मलायका आणि अरबाजच्या घटस्फोटाच्या बातमीनं त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. 2017 मध्ये ते विभक्त झाले. 

आणखी वाचा : उर्वशी रौतेलाच्या 'या' ड्रेसच्या किंमतीत, तुमचं संपूर्ण कुटूंब करु शकेल Europe Trip

काही वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये मलायकानं अरबाजच्या वाईट सवयींबद्दल सांगितलं होतं, ज्या तिला अजिबात आवडत नाहीत. अरबाजची वाईट गोष्ट सांगताना मलायका म्हणाली की, 'अरबाजला त्याच्या वस्तू कुठेही ठेवायची सवय आहे. तो एखादी वस्तू कधीच जागेवर ठेवत नाही.'

आणखी वाचा : नातीची मनधरणी कशी करतात आजोबा अमिताभ बच्चन...!

पुढे मलायका म्हणाली, मग जेव्हा त्याला त्या वस्तूंची गरज पडते, त्यावेळी तो सगळीकडे शोधत राहतो. इतकंच नाही तर या मुलाखतीत अरबाज देखील सहभागी होता. मलायकच्या वाईट सवयींविषयी बोलताना अरबाज म्हणाला, 'मलायका कधीच तिची चूक मान्य करत नाही. तिची ही गोष्ट मला आवडत नाही.'( malaika arora and arbaaz khan got divorced because of this reason) 

आणखी वाचा : 'हा मुलगा मोठा होऊन....', Sonam Kapoor च्या मुलाविषयी मोठी भविष्यवाणी आली समोर 

आता मलायका आणि अरबाजला विभक्त होऊन बराच काळ झाला आहे. मलायकाने अर्जुन कपूरसोबत आपल्या नवीन आयुष्याला सुरूवात केलीये. एवढंच काय तर गेल्या काही दिवसांपासून मलायका आणि अर्जुन लवकरच लग्न बंधनात अडकणार अशा चर्चा सुरु होत्या. मात्र, कॉफी विथ करणच्या शोमध्ये अर्जुननं सांगितलं की त्याचं संपूर्ण लक्ष हे त्याच्या करिअरवर आहे. दुसरीकडे अरबाज जॉर्जिया एंड्रियानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.