KBC 16: सहावीतल्या मुलानं जिंकले 12 लाख 50 हजार; बिस्किटबद्दलच्या प्रश्नावर डाव सोडल! तुम्हाला माहितीये का उत्तर?

KBC 16 : 'कौन बनेगा करोडपति 16' मध्ये ज्युनियर स्पर्धकानं बिस्किटबद्दलच्या प्रश्नावर सोडला खेळ... तुम्ही देऊ शकता का उत्तर?

दिक्षा पाटील | Updated: Nov 5, 2024, 04:52 PM IST
KBC 16: सहावीतल्या मुलानं जिंकले 12 लाख 50 हजार; बिस्किटबद्दलच्या प्रश्नावर डाव सोडल! तुम्हाला माहितीये का उत्तर?  title=
(Photo Credit : Social Media)

KBC 16 : 'कौन बनेगा करोडपति 16' चा नवा एपिसोड हा शो सुरु झाल्यापासून सतत चर्चेत आहे. आता या शोचा सगळ्यात ज्युनियर स्पर्धक अर्जुन अग्रवाल हॉटसीटवर दिसला. यावेळी अर्जुननं त्याला मोठं होऊन बुद्धिबळाचा ग्रॅंडमास्टर आणि डॉक्टर होण्याची इच्छा असल्याचं सांगितलं. तर हे ऐकल्यानंतर अमिताभ बच्चन यांना त्याचं खूप कौतूक वाटलं आणि त्यानंतर अर्जुनला बुद्धिबळातील तिसरा सगळ्यात तरुण असलेल्या ग्रॅंडमास्टर डी. गुकेसचा व्हिडीओ दाखवला. तर डी. गुकेशनं दिलेला मेसेज पाहून अर्जुनला खूप जास्त आनंद झाला आणि तो लगेच किंचाळत म्हणाला, 'सर, मी तुमचा खूप मोठा चाहता आहे.'

पुढे अर्जुनला अमिताभ खेळ पुढे घेऊन जातात आणि 12 वा प्रश्न विचारतात की सुर्यमालेच्या एकूण वस्तुमानाच्या किती टक्के भागवर सूर्याचा आहे? 
ए) 50% 
बी) 75% 
सी) 50% पेक्षा कमी
डी) 99% पेक्षा जास्त

अर्जुननं यावेळी योग्य उत्तर काय हे माहित नव्हतं म्हणून एक्सपर्ट अनुजा यांची मदत घेतली. पुन्हा एकदा स्पर्धकाला त्याचं योग्य उत्तर देण्यासाठी मदत केली. त्यांनी यावेळी ऑप्शन डी) निवडण्याचा सल्ला दिला. हे उत्तर अगदी योग्य येतं. त्यानंतर पुढे अमिताभ हे पुढे अर्जुनला 25 लाख रुपयांसाठी 13 वा प्रश्न विचारतात. मारी बिस्किटचं नवा कोणत्या देशाच्या शाही कुटुंबावरुन ठेवण्यात आलं आहे? 

 ए) इटली 
बी) रशिया
सी) मोनॅको
डी) फ्रान्स

हेही वाचा : सलमानच्या सततच्या 'वन नाईट स्टॅंड'ला कंटाळली होती सोमी अली; Aish चा उल्लेख करत केले गंभीर आरोप

अर्जुनला या प्रश्नाचं उत्तर माहित नव्हतं आणि त्यानं खेळ तिथेट क्विट करण्याचा निर्णय घेतला. तर अर्जुन एकूण 12,50,000 रुपये घरी घेऊन जातो. त्याशिवाय जाताना तो सांगतो की हे सगळे पैसे तो त्याच्या आई-वडिलांना देणार, याशिवाय तो बहीण नैनासाठी भेट वस्तू देखील घेणार आहे. खेळ क्वीट करण्याआधी अमिताभ अर्जुनला विचारतात की जर उत्तर द्यायचं असतं तर कोणता ऑप्शन निवडलं असता? तर अर्जुन ऑप्शन  ए) निवडतो मात्र, त्या प्रश्नाचं योग्य उत्तर हे बी) रशिया होतं.