धोनीच्या प्रश्नावर चिडली त्याची एक्स-गर्लफ्रेन्ड

‘जुली २’ या सिनेमातील अभिनेत्री राय लक्ष्मी प्रमोशनमध्ये बिझी आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये ती प्रमोशनसाठी जात असून जिथे जाईल तिथे महेंद्र सिंह धोनी तिचा पाठलाग करतोय.

Updated: Oct 31, 2017, 02:26 PM IST
धोनीच्या प्रश्नावर चिडली त्याची एक्स-गर्लफ्रेन्ड title=

मुंबई : ‘जुली २’ या सिनेमातील अभिनेत्री राय लक्ष्मी प्रमोशनमध्ये बिझी आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये ती प्रमोशनसाठी जात असून जिथे जाईल तिथे महेंद्र सिंह धोनी तिचा पाठलाग करतोय.

तुम्हाला वाटेल धोनी तिचा पाठलाग कसा आणि कशाला करेल? पण तो प्रत्यक्षात तिचा पाठलाग करत नाहीये. धोनी आणि राय लक्ष्मी यांच्या अफेअरच्या चर्चा या सिनेमामुळे पुन्हा एकदा सुरू आहेत. 

प्रमोशनच्या निमित्ताने राय लक्ष्मीला धोनीबाबत आवर्जून विचारलं जातं. त्यामुळे ती सध्या चांगलीच संतापलेली आहे. तिला धोनीबद्दल कुणी विचारल्यावर ती आता स्पष्टपणे ‘धोनी हा माझा भूतकाळ होता. तो एका कथेप्रमाणे होता. आता ती कथा विस्मरणात गेल्याचे ती सांगते आहे. 

सिनेमाबाबत न विचारता धोनीबद्दल सतत प्रश्न विचारण्यात येत असल्याने ती चिडलेली आहे. ती म्हणाली की, ‘मीडियाला माझ्या करिअरपेक्षा माझ्या आणि धोनीच्या नात्याबाबत जाणून घेण्यातच अधिक इंटरेस्ट असतो. आमच्या खासगी गोष्टींबाबत प्रश्न विचारल्याने त्यांना हेडलाईन मिळते, असं ती म्हणाली.

'धोनी ही माझ्या आयुष्याच्या भूतकाळातील एक कथा आहे. पुन्हा त्या कथेला उजाळा देऊन काय उपयोग होणार आहे? असा सवाल तिनं केलायं. जी व्यक्ती आता माझ्या आयुष्यातच नाही तिच्याबाबत चर्चा करून काय उपयोग? प्रत्येक व्यक्तीचा काहीतरी भूतकाळ असतो, त्यात काही व्यक्तींचा समावेश असतो. भूतकाळाबरोबर त्या व्यक्तींनाही मागेच सोडून द्यावं’, असं ती म्हणाली.