'झिलमिल' गाण्यातून घडणार 'मुसाफिरा'ची सफर

Musafiraa movie Jhilmil song :  'मुसाफिर' चित्रपटातील 'झिलमिल' गाण्यानं वेधलं सगळ्यांचे लक्ष. तुम्हालाही नक्कीच येईल तुमच्या मित्रांची आणि ट्रिपची आठवण. 

Updated: Jan 25, 2024, 06:43 PM IST
'झिलमिल' गाण्यातून घडणार 'मुसाफिरा'ची सफर  title=
(Photo Credit : PR Handover)

Musafiraa movie Jhilmil song : 'मुसाफिरा' आणि 'मन बेभान' या उत्स्फूर्तदायी गाण्यांनंतर आता 'मुसाफिरा' चित्रपटातील तिसरे गाणे नुकतेच सोशल मीडियावर झळकले आहे. 'झिलमिल' असे या गाण्याचे नाव असून हे बहारदार गाणं सलीम मर्चंट यांनी गायलं आहे. तर या गाण्याचे बोल अदिती द्रविड हिचे असून साई -पियुष यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. स्कॉटिश हायलँड्सच्या निसर्गरम्य वातावरणात हे गाणं चित्रित करण्यात आलय. हे गाणं पाहिल्यानंतर जणू हे डोळ्यांचे पारणे फिटणारे आहे.

पुष्कर जोग, पूजा सावंत, पुष्कराज चिरपुटकर, स्मृती सिन्हा, दिशा परदेशी यांची घनिष्ट मैत्री या गाण्यातून समोर येत आहे. सफरीवर निघालेले हे 'मुसाफिरा' जीवनाचा पुरेपूर आनंद लुटताना दिसत असून हे या गाण्यातून मैत्रीतील प्रेमही झळकत आहे. हे गाणे जितके सुरेल आहे, तितकेच चित्रीकरणस्थळही आकर्षक आहे. गाण्याबद्दल पुष्कर जोग म्हणाला,"'झिलमिल' हे गाणं खरंच खूप भारी आहे. स्कॉटिश हायलँड्सच्या एका सुंदर ठिकाणी आम्ही या गाण्याचे चित्रीकरण केले आहे. कोणीही प्रेमात पडेल असे हे स्थळ आहे. हे गाणं ऐकताना आणि पाहताना आपण स्वतःही तिथेच असल्याचा भास होईल. ही सफर आमच्यासाठीही खूप खास होती. हे गाणं ऐकताना तुम्हाला तुमच्या मित्रपरिवाराची आठवण आल्याखेरीज राहाणार नाही.'' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

चित्रपटाची संकल्पना आणि अर्थात सर्वकाही याविषयी बोलताना दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात, ''मुसाफिराच्या माध्यमातून मला प्रेक्षकांसाठी काहीतरी दर्जेदार करायचे होते. लॉकडाऊनच्या काळात सुचलेली माझी ही कथा चित्रपटात मांडण्याचा माझा हा प्रयत्न होता. मैत्रीची नवीन परिभाषा या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे. आयुष्यात मैत्री किती महत्वाची हेही ‘मुसाफिरा’च्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले आहे. मैत्रीपर भाष्य करणारा हा चित्रपट एक कौटुंबिक चित्रपट आहे.''

हेही वाचा : सिद्धार्थ चांदेकरचा लिपलॉक व्हिडीओ शेअर करत मिताली मयेकर म्हणाली, 'मी आहे कारण...'

आनंद पंडित मोशन पिक्चर्स, ऐश मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने, नितीन वैद्य प्रोडक्शन आणि गुझबम्प्स एंटरटेन्मेंट प्रस्तुत ‘मुसाफिरा’ चे दिग्दर्शन पुष्कर जोग यांनी केले आहे. दरम्यान, हा चित्रपट 2 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे मैत्रीवर आधारीत असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अशी आशा चित्रपटांच्या निर्मात्यांना आहे.