Jaya Bachchan Angry on Staff : लोकप्रिय दिग्गज अभिनेता जया बच्चन हा नेहमीच सगळ्यांच लक्ष वेधताना दिसतो. त्यांचं पापाराझींसोबतचं नातं आपल्या सगळ्यांना माहित आहे. जया बच्चन या अनेकदा कॅमेऱ्या समोर नाराज होतात किंवा चिडतात. त्यांचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता देखील असंच काहीसं झालं आहे की जेव्हा जया बच्चन विमानतळाच्या बाहेर येतात तेव्हा त्यांच्यासोबत अमिताभ बच्चन देखील दिसतात. जेव्हा त्या मुंबईला परतल्या तेव्हा विमानतळावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात ते टीमच्या एका मेंबरवर संताप व्यक्त करताना दिसले.
काल शुक्रवारी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे विमानतळावरून निघताना दिसल्या. पापाराझींनी शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये बिग बींनी काळ्या आणि पांढऱ्या रंगाचं जॅकेट परिधान केलं आहे. तर हेच घालून ते बाहेर पडताना दिसत आहे. तर दुसरीकडे अनिल अंबानी यांना मिठी मारली आहे आणि त्यांच्या गाडीतून जाण्या आधी सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. पण जया बच्चन हे कोणाला पाहून रागावतात. त्यांचे व्हिडीओ हे लोकांचं लक्ष वेधताना दिसतात. व्हिडीओमध्ये जया बच्चन या विमानतळावर उभ्या असल्याचे दिसते. तर त्या कोणाशी तरी बोलताना चिडल्याचे दिसते. त्यावेळी त्या त्यांच्या स्टाफवर चिडल्याचे पाहायला मिळते. त्या इतक्या चिडल्या होत्या की त्यांनी बोट दाखवत बोलत होत्या आणि गाडीच्या दिशेन सुरु जातात. त्यांचा हा व्हिडीओ पिंकव्हिलानं शेअर केला आहे.
काही दिवसांपूर्वी बच्चन कुटुंबाचे मित्र राजेश यादव यांची लेक रिकिनच्या लग्नात दिसले. ते बऱ्याच काळापासून एकमेकांना जोडलेले आहेत. लग्नाच्या एका फोटोत बिग बी, जया बच्चन आणि अभिषेक बच्चन राजेश यादवच्या कुटुंबासोबत पोज देताना दिसले. पण ऐश्वर्या राय फोटोत त्यांच्यासोबत दिसले नाही.
हेही वाचा : विराट कोहली आउट होताच 'हा' लोकप्रिय अभिनेता सोडायचा जेवण; आता सोशल मीडियावर मीम्स व्हायरल
दरम्यान, जया बच्चन यांच्या कामाविषयी बोलायचं झालं तर त्यांचं राजकारण आणि अभिनयातील करिअरला घेऊन ते चर्चेत असतात. तर 2004 मध्ये समाजवादी पार्टी त्यांनी जॉईन केली. आता राज्यसभेतून देखील त्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्या अखेर करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' मध्ये दिसल्या. त्यात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग महत्त्वाच्या भूमिकेत होते.