'झी महागौरव 2022' मध्ये करिष्मा कपूरची खास हजेरी, पाहा कलाकारांचे रेड कार्पेट लूक

नुकताच झी मराठीचा खास पुरस्कार सोहळा पार पडला. 

Updated: Mar 11, 2022, 02:20 PM IST
'झी महागौरव 2022' मध्ये करिष्मा कपूरची खास हजेरी, पाहा कलाकारांचे रेड कार्पेट लूक title=

मुंबई : कलाकारांना त्यांच्या कामाचं कौतुक केलं की आणखीन चांगलं काम करण्यासाठी अजूनच ऊर्जा मिळते. जेव्हा या कलाकारांचं सगळ्यांसमोर कौतुक केलं जातं तेव्हा त्यांना कामाची जणू पोचपावतीच मिळते.

नुकताच झी मराठीचा खास पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहऴ्याला मराठमोळ्या कलाकारांनी पारंपारिक पेहराव करत हजेरी लावली.

 मराठी भाषा आणि मराठी नाटक चित्रपटांसाठी झी मराठी गेली 21 वर्ष कटिबद्ध आहे. मराठी नाटक चित्रपटांसाठीच 'झी मराठी'चं हे समृद्ध नातं सन 2000 पासून सुरु झालं होतं.

या समृद्ध नात्याचा गौरव करण्यासाठी यंदाचा झी गौरव पुरस्कार अगदी दिमाखदारपणे संपन्न झाला.

मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते अशा प्रतिष्ठित झी गौरव 2022 पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. 

गेल्या 21 वर्षातल्या, 21 महत्वाच्या चित्रपटांचा गौरव करून त्यांनी मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीसाठी केलेल्या महान कार्याचा महागौरव यंदा झी गौरव पुरस्कार सोहळ्यात करण्यात आला.या सोहळ्याचे सूत्रसंचालन महाराष्ट्राचा सुपरस्टार स्वप्नील जोशी याने केलं.

 रेड कारपेटवर आलेल्या प्रत्येक कलाकाराने आपल्या स्टाईल सेन्सची झलक दाखवली आणि त्यांच्या सॉल्लिड फॅशन सेन्सने या सोहळ्यातील ग्लॅमर कोशंट वाढवला.

रंगतदार स्किट्स आणि दर्जेदार डान्स परफॉर्मन्सेसमध्ये जल्लोषात हा पुरस्कार सोहळा रंगला. या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री करिष्मा कपूरने खास परफॉर्म्नस सादर केला.

 

करिष्मा कपूर ही झी महागौरवच्या मंचावर थिरकली. तिच्या अप्रतिम नृत्याविष्काराला उपस्थित कलाकारांकडून भरभरून दाद मिळाली. 

या सोबतच जॉनी लिव्हर, श्रेयस तळपदे, नागराज मंजुळे, सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकर, प्रार्थना बेहेरे, सई ताम्हणकर, प्रिया बापट, उर्मिला कानिटकर, संजय जाधव, ललित प्रभाकर, वैदेही परशुरामी, रवी जाधव, केतकी माटेगावकर आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. 

आता कुठल्या कलाकारांनी विजेतेपद पटकावलं हे प्रेक्षकांना लवकरच कळेल.