नवी दिल्ली : अभिनेता हृतिक रोशन पुन्हा एकदा लग्न करण्याच्या तयारीत आहे. २०१४मध्ये सुझान खान हिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर हृतिकचे नाव अभिनेत्री कंगना राणावतशी जोडले गेले होते. मात्र त्यांच्यातील वादामुळे हे नातेही तुटले.
सध्या अशी चर्चा सुरु आहे की हृतिक आपल्या मुलांसाठी पुन्हा एकदा लग्न करणार आहे. लग्नासाठी हृतिकने अशी मुलगी निवडलीये जी तिच्या घरच्यांनाही पसंत पडेल. रिपोर्ट्सनुसार, घरच्यांशी चर्चा करुन मुलीची निवड करण्यात आलीये. हृतिकच्या होणाऱ्या नवरीला कदाचित तुम्हीही ओळखता. मात्र हे नाव वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. तुमची उत्सुकता आम्ही अधिक ताणून ठेवणार नाही. जाणून घ्या कोण आहे हृतिकची होणारी नवी बायको
डेक्कन क्रोनिकलने हृतिकच्या जवळच्या मित्राच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार हृतिक आणि त्याची पत्नी सुझान यांच्यातील दुरावा संपलाय. दोन्ही कुटुंबानी केलेल्या प्रयत्नानंतर हृतिक आणि सुझान पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकत असल्याचे समजतेय.
रिपोर्टनुसार, गेल्या काही वेळापासून हृतिक आणि सुझान एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत. दोघांनी आपल्यातील समस्या मागे टाकत पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. मुलांसाठी दोघांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेत असल्याचे म्हटले जातेय. घटस्फोटानंतर दोन्ही मुले एकत्र आई-वडिलांसोबत राहू शकत नव्हते. ते अनेकदा हृतिक अथवा सुझानकडे ही बाब बोलून दाखवत. त्यामुळे या दोघांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय़ घेतल्याचे बोलले जातेय.
राकेश रोशन यांच्या 'कहो ना प्यार है' या सिनेमातून हृतिकने बॉलीवूडमध्ये पाय ठेवला होता. २०००मध्ये आलेला हा सिनेमा सुपरहिट ठरला. त्यानंतर काहीच दिवसांनी हृतिने बालपणीची मैत्रीण सुझानशी लग्न केले.
काही कारणास्तव दोघांच्या नात्यामध्ये दुरावा येऊ लागला. त्यामुळे २०१४मध्ये दोघांनी स्वेच्छेने घटस्फोट घेतलाय. यानंतर आता हे दोघेही पुन्हा लग्न करतायत. दरम्यान, या बाबत दोघांच्याही घरच्यांनी अद्याप कोणतेही विधान केलेले नाही.