मुंबई: प्रसिद्ध गायिकेनं आपल्या सोबत झालेल्या लैंगिक शोषणासंदर्भात धक्कादायक खुलासा केला आहे. तिने हे सांगताना आपलं दु:ख व्यक्त केलं. तिने सांगितलेल्या अनुभव अंगावर काटा आणणारा होता. प्रसिद्ध हॉलिवूड गायिका ग्लोरिया इस्टेफनने आपल्या लैंगिक शोषण अल्पवयीन असताना झाल्याचं सांगितलं. तिच्या या अनुभवाने हॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली.
गायिकेनं सांगितला आपला तो वाईट अनुभव
'ग्लोरिया इस्टेफनने सांगितलं की मी 9 वर्षांची असताना माझं लैंगिक शोषण करण्यात आलं. त्यावेळी मला ही गोष्ट आईला सांगायची होती. मात्र त्या व्यक्तीनं मला धमकी दिली. तो व्यक्ती माझ्या आईला खूप चांगलं ओळखत होता. इतकच नाही तर आईलाही तो व्यक्ती खूप आवडत होता.'
'रेड टेबल टॉकच्या एका भागादरम्यान, ग्लोरिया इस्टेफनने सांगितलं की, तो माझा सांगिताचा शिक्षक होता. माझ्या आईचा त्याच्यावर खूप विश्वास होता. मी त्याला ही गोष्ट सांगितली तर तो आईला जीवे मारेल अशी धमकी दिली होती. आईसाठी तो कुटुंबाचा भाग होता. तो मला संगीत शिकवायचा आणि माझ्या आईशी पहिल्या भेटीत त्याने माझी खूप स्तुती केली'.
'शिक्षकाच्या बोलण्याने माझ्या आईला एक वेगळाच विश्वास वाटू लागला. ती त्याच्या शब्दांमध्ये फसली. स्वतःला भाग्यवान समजू लागली. आईला वाटू लागले की तो एक चांगला माणूस आहे आणि तो मला चांगले शिक्षण देईल असा तिचा ग्रह झाला.'
असा दिला होता त्रास
'मला त्याने हळूहळू त्रास द्यायला सुरुवात केली. त्याचं हे धाडस हळूहळू वाढत गेलं आणि त्याचे स्पर्शही वाढले. मी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मी त्याला म्हटलं देखील की तुम्ही खूप चुकीचं करत आहात. पण त्याने माझ्या आईला जीवे मारण्याची धमकी देऊन माझं तोंड बंद केलं.
'मी खूप घाबरले होते. मात्र हिंमत करून आईला ही गोष्ट सांगितली. ही गोष्ट आईला सांगितल्यानंतर तिने लगेच पोलिसांना फोन केला.' 64 वर्षांची ग्लोरिया एक यशस्वी गायिका आहे. तिने हॉलिवूडमध्ये अनेक गाणी गायली आहेत. अभिनेत्री आणि उत्तम व्यवसायक म्हणून तिची एक वेगळी ओळखही आज आहे. तिला 3 वेळा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे.