अनुषा दांडेकर आई? बाळासोबतचा फोटो शेअर करत स्वतःला म्हणाली 'मम्मी'...

अनुषा दांडेकर तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त प्रसिद्ध आहे. 

Updated: Jun 3, 2022, 08:48 PM IST
अनुषा दांडेकर आई? बाळासोबतचा फोटो शेअर करत स्वतःला म्हणाली 'मम्मी'... title=

मुंबई : टीव्ही अभिनेत्री आणि व्हिडिओ जॉकी अनुषा दांडेकर तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त प्रसिद्ध आहे. अलीकडेच, तिने तिच्या एका पोस्टने सर्वांना आश्चर्यचकित केलं की, तिच्या आयुष्यात एक 'बाळ' आहे आणि तिने स्वतःला 'मम्मी' म्हणून संबोधलं आहे.

अनुषा दांडेकरने नुकतेच तिच्या इन्स्टावर एका लहान मुलीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती बाळाचे लाड करताना दिसत आहे. यासोबतच तिने एक पोस्ट लिहून आपल्या बाळाची ओळख जगाला करून दिली आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''शेवटी मला एक लहान मुलगी सापडली जिला मी स्वतःचं म्हणू शकते. मी माझी लहान मुलगी सहाराची ओळख करून देत आहे. माझ्या आयुष्यातील खूप महत्वाच प्रेम. मॉन्स्टर, गँगस्टा  मी तुमची काळजी घेणार आहे. तुला बिघडवणार आहे  आणि तुझे सदैव रक्षण करणार आहे ! आई लव यू बेबी गर्ल. तुझीच मम्मी."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अनुषा दांडेकरच्या पोस्टवरून असं दिसत आहे की, तिने ही मुलगी दत्तक घेतली आहे. काही मीडिया रिपोर्ट्सही हेच सांगत आहेत, पण तिची बहीण शिबानी दांडेकरची प्रतिक्रिया काही वेगळंच सांगत आहे. अनुषाच्या पोस्टवर कमेंट करत शिबानीने लिहिलं की, "लोकांची मुलं चोरणं आणि फोटो काढणं बंद कर" या सगळ्यावरुन बे तिचं बाळ आहे की अन्य कोणाचं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.