Deepika Padukone ने नवख्या अभिनेत्यासोबत केल्या सर्व मर्यादा पार, बोल्ड सीनमुळे चर्चेत

दीपिकासोबत बोल्ड सीन करणार नवखा अभिनेता आहे तरी कोण?  

Updated: Jan 24, 2022, 01:40 PM IST
Deepika Padukone ने नवख्या अभिनेत्यासोबत केल्या सर्व मर्यादा पार, बोल्ड सीनमुळे चर्चेत title=

मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या तिच्या 'गहराइया' चित्रपटामुळे तुफान चर्चेत आहे. चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. गाण्याचं नाव आहे, 'डूबे'. हे गाणं दीपिका आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी दोघांवर चित्रीत करण्यात आलं आहे. गाण्यात सिद्धांत आणि दीपिका एकमेकांना पुन्हा पुन्हा किस करताना आणि फ्लर्ट करताना दिसत आहेत. 

गाण्यात दीपिका आणि सिद्धांतने बोल्ड सीन दिले आहेत. या गाण्यात दीपिका नवख्या अभिनेत्यासोबत बोल्ड सीन करताना दिसत आहे. सध्या गाण्याची आणि दीपिकाने दिलेल्या बोल्ड सीनची तुफान चर्चा रंगत आहे. 

'गहराइया' चित्रपटातील पहिलं गाणं गीतकार कौसर मुनीर यांनी लिहिले आहे. गायिका लोथिकाने गाण्याला आवाज दिला आहे. अंकुर तिवारीने दुबेने गाण्याच्या संगीतावर काम केले आहे.

दीपिका लवकरचं ' गहराइया' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रटात दीपिका शिवाय सिद्धांत चर्तुवेदी, अनन्या पांडे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपट 11  फेब्रुवारी रोजी Amazon Prime Video वर रिलीज होईल.