Onkar Bhojane & Isha Keskar : छोट्या पडद्यावरील महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) हा कॉमेडी शो प्रचंड लोकप्रिय आहे. शोमधील प्रत्येक कलाकारानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. दरम्यान, या शोमध्ये गेल्या काही दिवसांपासून अभिनेता ओंकार भोजने (Omkar Bhojne) दिसला नाही. त्यानंतर तो अचानक 'फू बाई फू'च्या प्रोमोमध्ये दिसला. ते पाहिल्यानंतर त्यानं महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधून काढता पाय घेतल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
काही दिवसांपूर्वी 'सरला एक कोटी' (Sarla Ek Koti) या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. पण घोषणा झाल्यानंतर चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार असा प्रश्न अनेकांना पडला. नावावरून हा चित्रपट काय असेल, कसा असेल याचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही. या चित्रपटात ओंकार भोजने आणि ईशा केसकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार हे ऐकून सर्वांचीच उत्सुकता वाढली होती.
ओंकार भोजने लवकरच सरला एक कोटी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेत्री ईशा केसकर ही या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर, पोस्टर आणि गाणी सध्या सुपरहिट ठरताना दिसत आहे. या चित्रपटातील केवडयाचं पान तू या गाण्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. या गाण्यातील रोमँटिक सीनवरुन अनेक चर्चा रंगताना दिसत आहे. त्याबद्दल नुकतंच ईशा केसकरने प्रतिक्रिया दिली.
या चित्रपटात ती सरलाची भूमिका साकारताना दिसत आहे. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या ट्रेलर लाँचवेळी ईशा केसकरने चित्रपटातील विविध गोष्टींबद्दल खुलासे केले. यावेळी ईशाला या चित्रपटातील रोमँटिक सीनबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या सिनेमातील रोमँण्टिक सीन तू कसा शूट केला? यावर ती उत्तर देत म्हणाली
''केवड्याचं पान तू हे गाणं शूट करताना एक वेगळी जबाबदारी होती. याआधी मी कधीही रोमँटिक सीन किंवा दृश्याचे सीन शूट केला नव्हता. पण मग त्यावेळी मी माझी आणि ओंकारच्या मैत्रीचा आधार घेतला. मग ते गाणं शूट केलं'', असं ईशा केसकर म्हणाली. टीझरमधील इशा केसकरचा लूक पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळतेय.
''मोठ्या पडद्यावर ते कसं दिसेल याबद्दल आम्ही अजिबात विचार केला नाही. जर आम्ही तो केला असता तर कदाचित आम्हाला दडपण आलं असतं. आम्ही एकमेकांचे हात धरले, मित्रा असं म्हटलं आणि त्यानंतर ते गाणे शूट केलं'', असं ईशा केसकर म्हणाली. ''सरला एक कोटी'' या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन नितीन सिंधुविजय सुपेकर यांनी केलं आहे हा चित्रपट येत्या २० जानेवारी २०२३ ला प्रदर्शित होणार आहे.