धर्मेंद यांच्या भावनिक पोस्टला लेकीचं उत्तर, Esha Deol ची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

Esha Deol Post on Father Dharmedra: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या पोस्टनं चाहत्यांचे लक्ष वळवले आहे. त्यातून आता त्यांची लेक ईशा देओलनंही आपल्या वडिलांसाठी एक इमोनशल पोस्ट शेअर केली आहे. नक्की तिनं आपल्या या पोस्टमध्ये नक्की काय लिहिलंय? 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 29, 2023, 05:11 PM IST
धर्मेंद यांच्या भावनिक पोस्टला लेकीचं उत्तर, Esha Deol ची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट title=
June 29, 2023 | Esha Deol Shares Old Photo With Dharmendra after her father emotional post latest entertainment news

Esha Deol Post on Father Dharmedra: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या नातवाचे करण देओलचे या महिन्यात 18 जून रोजी दणक्यात लग्न उरकले. त्यानिमित्तानं त्याच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली होती. यावेळी सनी देओलचा लेक करण देओलच्या लग्नाला धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन्ही मुली ईशा देओल आणि अहाना देओल यांची अनुपस्थिती पाहायला मिळाली त्यामुळे या तिघीजणी अनुपस्थित का होत्या याबद्दलही चांगलीच चर्चा रंगली होती. त्यावरून आता या सगळ्यात धर्मेंद यांची एक पोस्ट आज सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसते आहे. त्यामुळे सर्वच चर्चांना उधाण आलं आहे. 

धर्मेंद्र आपल्या पोस्टमध्ये लिहितात की, ''ईशा, अहाना, हेमा आणि माझी सगळी मुलं... तख्तानी कुटुंब आणि वोहरा कुटुंबावर माझं खूप प्रेम आहे आणि तुमच्या सगळ्यांचे मनापासून मी आदर करतो... माझं वय आणि आजार मला सांगत आहेत की मी तुमच्यासाठी पर्सनली बोलू शकत होतो... पण..." सध्या त्यांच्या या पोस्टनं धर्मेंद्र यांच्यावरील काळजी चाहत्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सध्या त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. या पोस्टमधून ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना खूप काही सांगायचे आहे परंतु काही सांगता येत नाहीये असे समजते आहे. यावेळी आपल्या लेकीचा ईशा देओलचा फोटो त्यांनी शेअर करत हे कॅप्शन लिहिलं आहे आणि आपल्या लेकारांची माफी मागितली आहे. त्यामुळे चाहत्यांना प्रश्न पडला आहे की नेमकं असं काय झालंय.

हेही वाचा - काहीही कारण नसताना Dharmendra यांची पत्नी- मुलींसाठी भावनिक पोस्ट; चाहत्यांची चिंता वाढली

यावर आता धर्मेंद्र यांची लाडकी लेक ईशा देओलनंही एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिनं आपल्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे आणि त्यात अभिनेते धर्मेंद्रही दिसत आहेत. हा आनंदी फोटो शेअर करताना ईशानं म्हटलंय की, ''पापा, मी तुमच्यावर खूप प्रेम करते. तुम्ही सर्वात उत्कृष्ट वडील आहात. तुमच्यावर आम्ही निस्वार्थी प्रेम करतो आणि हे तुम्हालाही माहिती आहे. आनंद लुटा आणि कायमच आनंदी राहा आणि निरोगी राहा. खूप प्रेम.'' सध्या ईशा देओलच्या या पोस्टनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहेत. त्यामुळे सध्या सगळीकडेच या पोस्टची चर्चा रंगली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

87 वर्षांचे असलेले अभिनेते धर्मेंद्र हे आपल्या अभिनयासाठी आजही ओळखले जातात. त्यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट यावर्षी जूलैमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्यामुळे त्यांच्या या चित्रपटाची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.