झी युवा देणार घर बसल्या भरघोस बक्षिसं जिंकण्याची संधी

एक आगळा वेगळा कार्यक्रम 

Updated: Oct 20, 2020, 07:02 PM IST
झी युवा देणार घर बसल्या भरघोस बक्षिसं जिंकण्याची संधी title=

मुंबई : लवकर प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार एक आगळा वेगळा कार्यक्रम 'एक कॉल घरात मॉल'. झी युवा ही वाहिनी नेहमीच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी तत्पर असते. वेगळ्या धाटणीची कथानकं आणि अनोखे कथाबाह्य कार्यक्रम सादर करण्यात झी युवा ही वाहिनी नेहमीच आघाडीवर असते.

 'झी युवा' ही वाहिनी नेहमीच प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आली आहे. प्रेक्षकांना आवडेल असं झकास कन्टेन्ट विविध मालिकांच्या माध्यमातून, या वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे. 'झी युवा'ने नेहमीच प्रेक्षकांना आकर्षित करून त्यांच्या टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं आहे. त्यांच्यासाठी ढासू मालिकांची खास मेजवानी, दर्जेदार कथाबाह्य कार्यक्रम दाखवण्याचा वाहिनीचा प्रयत्न असतो. लॉकडाऊन मध्ये घरात असलेले आणि वर्क फ्रॉम होम करणारे प्रेक्षक आता घरी बसल्या बसल्या एक फोन कॉल करून अनेक बक्षिसं जिंकू शकतात

आता मनोरंजनसोबतच झी युवा प्रेक्षकांना घर बसल्या बक्षिसं जिंकण्याची संधी देणार आहे. एक कॉल घरात मॉल या आगामी कार्यक्रमातुन झी युवाच्या लाडक्या प्रेक्षकांना काही प्रश्नांची उत्तरं देऊन भरगोस बक्षिसं जिंकता येतील. हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रेक्षकांनी 9107072424 या नंबरवर कॉल करायचा आहे. तेव्हा घरबसल्या बक्षिस जिंकण्याची ही सुवर्णसंधी दवडू नका आणि पाहत राहा झी युवा.