'या'अभिनेत्रींनी मुलासोबत आणि वडिलांसोबत केला रोमान्स...पाहा फोटो

बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी पडद्यावर रियल लाइफ बाप आणि मुलासोबतही रोमान्स केला आहे.  

Updated: May 10, 2022, 04:17 PM IST
'या'अभिनेत्रींनी मुलासोबत आणि वडिलांसोबत केला रोमान्स...पाहा फोटो title=

मुंबईः चित्रपटातील पात्रं अनेकदा बदलतात. कधी एखाद्या अभिनेत्याला वडिलांची तर कधी मुलाची भूमिका करावी लागते. चित्रपट बदलले की त्यांच्यासोबत पात्रही बदलतात. मात्र, आज आम्ही तुमच्यासाठी अशा बॉलिवूड अभिनेत्रींची यादी घेऊन आलो आहोत ज्यांनी त्यांच्या करिअरमध्ये रियल लाइफ पिता आणि मुलासोबत काम केले आहे. एवढेच नाही तर या सौंदर्यवतींनी पडद्यावर वडील आणि मुलासोबत रोमान्सही केला आहे.

डिंपल कपाडियाने देखील माधुरी दीक्षितप्रमाणे विनोद खन्ना आणि अक्षय खन्ना यांच्यासोबत पडद्यावर रोमान्स केला आहे. डिंपल विनोद खन्नासोबत 'खून का कर्ज' आणि 'इन्साफ' या चित्रपटात दिसली. त्याचवेळी 2001 मध्ये रिलीज झालेल्या 'दिल चाहता है' या सुपरहिट चित्रपटात तिने अक्षय खन्नाच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती.

माधुरी दीक्षितने 80 च्या दशकात प्रसिद्ध अभिनेते विनोद खन्ना यांच्यासोबत 'दयावान' सिनेमात काम केलं. या सिनेमात दोघांमध्ये इंटिमेट सीन शूट करण्यात आले होते. त्यानंतर 1997 मध्ये आलेल्या 'मोहब्बत' चित्रपटात माधुरीने विनोद खन्ना यांचा मुलागा अक्षय खन्नासोबत रोमान्स केला.

 बॉलीवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनीबद्दल जिने राज कपूर यांच्या 'सौदागर' चित्रपटातून पदार्पण केले. यानंतर हेमाने रणधीर कपूरसोबत 1974 साली 'हाथ की सफाई' चित्रपटात काम केले.

या यादीत राणी मुखर्जीचाही समावेश आहे. तिने अभिषेक बच्चनसोबत 'युवा', 'बस इतना सा ख्वाब है', 'कभी अलविदा ना कहना' आणि 'बंटी और बबली' सारख्या चित्रपटात काम केले. बहुतेक चित्रपटांमध्ये दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. त्याचवेळी राणीने अमिताभ बच्चन यांच्यासोबत 2005 साली आलेल्या 'ब्लॅक' चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात दोघांमधील किसिंग सीनही शूट करण्यात आला होता.

बॉलिवूड स्टार धर्मेंद्र आणि त्याचा मोठा मुलगा सनी देओल यांनी अभिनेत्री डिंपल कपाडियासोबत पडद्यावर रोमान्स केला आहे. डिंपल आणि सनी यांनी 1984 मध्ये 'मंझिल मंझिल' या चित्रपटात एकत्र काम केले होते, तर धर्मेंद्र यांनी 1991 मध्ये 'मस्त कलंदर' आणि 'दुष्मन देवता' या चित्रपटात डिंपल कपाडियासोबत रोमान्स केला होता.