'लव्ह अँड वॉर' हिट होणार हे नक्की! आलिया-रणबीरच्या चित्रपटात दीपिका पदुकोणसह 'या' व्यक्तीची एन्ट्री

संजय लीला भंसाली यांच्या 'लव्ह अँड वॉर' चित्रपटात आलिया भट्टनंतर आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. हा चित्रपटात अभिनेत्री कोणती भूमिका साकारणार आणि कधी चित्रपट कधी रिलीज होणार. जाणून घ्या सविस्तर

सोनेश्वर पाटील | Updated: Dec 24, 2024, 12:35 PM IST
'लव्ह अँड वॉर' हिट होणार हे नक्की! आलिया-रणबीरच्या चित्रपटात दीपिका पदुकोणसह 'या' व्यक्तीची एन्ट्री title=

Love & War : संजय लीला भंसाली यांच्या 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. या चित्रपटासाठी पहिल्यांदा आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि विक्की कौशल यांची निवड झाली. अशातच आता 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटात एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री झालीय. त्यासोबतच सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारा ओरी देखील या चित्रपटात दिसणार आहे. 

ई-टाइम्सच्या रिपोर्टनुसार, दीपिका पदुकोण ही संजय लीला भंसाली यांच्या 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटात कॉमिओ करणार आहे. तर बॉलिवूड कलाकारांचा दोस्त ओरी देखील या चित्रपटात खास भूमिकेत दिसणार आहे. तो अभिनेत्री आलिया भट्टच्या जवळच्या मित्राची भूमिका साकारणार आहे. 

काय आहे चित्रपटाची कहानी आणि रिलीज डेट? 

'लव्ह अँड वॉर' या चित्रपटात आलिया भट्ट कॅबरे डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. तर रणबीर कपूर आणि विक्की कौशल हे दोघे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दोघे इंडियन आर्म्ड फोर्सच्या ऑफिसरच्या भूमिकेत असणार आहेत. 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भंसाली करणार आहेत. 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटाची रिलीज डेट देखील समोर आली आहे. हा चित्रपट 20 मार्च 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

दीपिका पदुकोण ही शेवटची बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या 'सिंघम अगेन' चित्रपटात दिसली होती. तर त्याआधी प्रभासच्या 'कल्कि 2898 एडी' या चित्रपटात दिसली होती. तेव्हापासून दीपिका पदुकोण ही प्रसूती रजेवर आहे. तिने 8 सप्टेंबर रोजी मुलीला जन्म दिला. जिचे नाव तिने दुआ ठेवलं आहे. तेव्हापासून, अभिनेत्री तिच्या मुलीसोबत वेळ घालवत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दिलजीतच्या शोमध्ये देखील दिसली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

'अल्फा'मध्ये दिसणार आलिया भट्ट

आलिया भट्ट ही शेवटची 'जिग्रा'चित्रपटात दिसली होती. त्यानंतर आता ती 'अल्फा' या चित्रपटात देखील दिसणार आहे. याच चित्रपटात आलिया भट्टसोबत अभिनेत्री शर्वरी वाघ देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.