लग्नानंतर काम करणार नाही 'ही' टीव्ही अभिनेत्री!

 टी.व्ही. अभिनेत्री दीपिका कक्कड लग्नानंतर फार आनंदी आहे. 

Updated: Jul 4, 2018, 02:56 PM IST
लग्नानंतर काम करणार नाही 'ही' टीव्ही अभिनेत्री! title=

मुंबई : टी.व्ही. अभिनेत्री दीपिका कक्कड लग्नानंतर फार आनंदी आहे. अलिकडेच तिने एका मुलाखतीत सांगितले की, ती आयुष्यातील सर्वात सुंदर टप्प्यावर आहे. तिने दिलेली माहिती तिच्या चाहत्यांना सुखावणारी आहे.
दीपिकाने सांगितले की, मी काम सोडून हाऊसवाईफ बनण्यास तयार आहे. तिने सांगितले की, जर शोएबने मला सांगितले की, बेबी तू आराम कर. मी काम करण्यासाठी सज्ज आहे. तर मी लगेचच हो बोलेन. तिला घरी आराम करायला आवडेल, असे तिने सांगितले.

लवकरच मदर्स क्लबमध्ये

लवकरच ते बाळाचे प्लॅनिंगही करतील असेही तिने सांगितले. तिने सांगितले की, यावर्षी मी ज्या महिलांना मदर्स डे च्या शुभेच्छा दिल्या त्यापैकी ९०% महिलांनी मला लवकरच मदर्स क्लबमध्ये सहभागी होण्यास सांगितले. पण माझे लग्न आताच झाले आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी आम्ही बेबी प्लॅन करु.

या मालिकेमुळे घराघरात पोहचली

सध्या दीपिका हॉरर शो कयामत की रात मध्ये काम करत आहे. शो मध्ये ती सुहासिनी नावाच्या महिलेची भूमिका साकारत आहे. ससुराल सिमर का या मालिकेतून दीपिकाने आपल्या अभिनयातील करिअरला सुरुवात केली होती. याच शो मुळे तिला घराघरात पोहचली.

शोएब-दीपिकाच्या मेंहदीपासून हळदीपर्यंतचे फोटोज....

हे तिचे दुसरे लग्न

लग्नानंतर धर्म परिवर्तन केल्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकारल्यावर तिने फैजा इब्राहिम असे नाव धारण केले. टी.व्ही. अभिनेता शोएब इब्राहिमसोबत २२ फेब्रुवारीला विवाहबद्ध झाली. हे दीपिकाचे दुसरे लग्न आहे. यापूर्वी तिने रौनक मेहतासोबत विवाहगाठ बांधली होती. पण त्यांचे नाते २ वर्षांपेक्षा अधिक काळ टिकले नाही. 

शोएब दीपिका विवाहबद्ध....